- राकेश कदम - मणिपूर राज्यातील दंगलीमध्ये महिलांवर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केली.
मणिपूर राज्यातील दंगलींना केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सोलापुरात निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव म्हणाले, मे महिन्यापासून मणिपूर राज्यात दंगली उसळल्या आहेत. भाजप सरकारने या दंगली नियंत्रणात आणल्या असत्या तर महिलांवरील अत्याचाराचा प्रकार घडला नसता. या घटनेमुळे आम्ही सर्वजण देशातील लोकशाही टिकेल की नाही या चिंतेत आहोत. सरकारने या प्रकरणातून धडा घ्यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहर सपाटे, शंकर पाटील, नाना काळे, महिला शहराध्यक्ष सुनिता तोटे, ग्रामीण महिला अध्यक्ष सुवर्णा शिवपुजे, नलिनी चंदिले, प्रतीक्षा चव्हाण, संगीता जोगदनकर, पुनम बनसोडे, फारुक मटके, चंद्रकांत पवार, अजित पात्रे, संजय कुराडे, संपन्न दिवाकर, गफूर शेख, सर्फराज शेख, बाळासाहेब मोरे, अजित बनसोडे, रेखा सपाटे, लता फुटाणे उपस्थित होते..