सोलापूर : संशय घेत, शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देत बेडरूम मधील कपाटात मुकबंधन पत्र, ताईत, कोळसा, हळकुंड, शंख, बिबळ अशा वस्तूू ठेवत सुनेला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सासुसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनुराधा रितेश बागलकोटी (वय ३२) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अनुराधा यांचा रितेश यांच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. शिवाय छोट्या छोट्या कारणावरून त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. तसेच कपाटाला हात लावू नको असे म्हणत कपाटात बिबळ, शंख, हळकूंड अशा वस्तू ठेवत भीती घालत होते, अशयाची फिर्याद अनुराधा यांनी दिली आहे.
या फिर्यादीवरून सासू रेणुका बागलकोटी, सासरे शिवानंद बागलकोटी, नणंद तनुश्री, आज्जे सासू मीनाक्षी शाबादी, मावस सासू ज्योती बाबानगरे (सर्व रा. विजयपूर, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार संतोष पापडे करीत आहेत.