शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

सोलापूर: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; वाहनांची गती उठली जीवावर

By appasaheb.patil | Published: November 12, 2022 1:40 PM

गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही.

सोलापूर : गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही. एखाद्या अपघातात सारे कुटुंबच नाहीसे झाल्याचे दिसते तेव्हा तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त केली जाते. नंतर जगाचे, जगण्याचे रहाटगाडगे सुरूच राहते. परंतु अपघातात ज्यांचे प्राण गेले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबियांचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

रस्ते दुहेरी, चार पदरी, सहा पदरी, आठ पदरी असे प्रशस्त झाले आहेत. आणखीन काही रस्ते होत आहेत. त्यावरून सुसाट अगदी प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने चालविली जात आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे अफाट प्रगती झाली असली तरी कदाचित तीच नेमकी काळरात्र ठरत असावी असे बोलले जात आहे. अपघात केवळ राष्ट्रीय महामार्गावरच होतात असे नाही तर लहान-मोठ्या रस्त्यावरही होतात. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय अपघातांमुळे अनेकांना अपंगत्वही आले आहे.

आकडेवारीवर एक नजर...

जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंतएकूण अपघात - ८४५एकूण मयत - ४९२एकूण जखमी - ९३६यामुळे होतात अपघात...

-वाहनचालकांचा हलगर्जीपणा-भरधाव वेग-ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न-नशा करून वाहन चालविणे- नियमांचा भंग करणे

स्पीड लिमिट तोडणाऱ्यांना लाखांचा दंड

महामार्गावर नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्या वाहनांना दंड केला जातो. यासाठी ग्रामीण पेालिसांकडून महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथके तैनात करण्यात आले आहेत.वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगात वाहने चालवू नये. शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा, वेगाच्या मर्यादेचे पालन करावे, सीटबेल्टचा वापर करावा. नागरिकांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी मदत करावी. वाहने सावकाश चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा.

-महेश स्वामी,पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.

टॅग्स :Solapurसोलापूर