शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

चायनाची मक्तेदारी मोडण्यावर सोलापुरातील कारखानदारांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:16 AM

सोलापुरात तयार होताहेत अनेक प्रकारचे युनिफॉर्म; शहरात शेकडो गारमेंटचे काम घरगुती पद्धतीने

ठळक मुद्देअसोसिएशन अंतर्गत ३०० गारमेंट युनिट सभासद कार्यरत आहेतगारमेंट इंडस्ट्रीमध्ये सोलापूरचे ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत शेकडो प्रकारच्या युनिफॉर्म तयार करण्याची कुशलता सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर युनिफॉर्म हब म्हणून ओळख असलेल्या चायनाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शहरातील कारखानदारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अनेक प्रकारच्या चांगल्या दर्जाचे युनिफॉर्म सोलापुरात तयार करीत असताना या कारखानदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर बनण्याचा संदेश दिला आहे. 

यापूर्वी सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन भरवले गेले. यास जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. येथील गारमेंट इंडस्ट्रीमधील उलाढाल दोनशे कोटींहून अधिक आहे. भविष्यात ती अनेक पटीने वाढू शकते. तशी ताकद आणि कुशल मनुष्यबळ सोलापुरात आहे. सोलापूरकडे केंद्र व राज्य सरकारने विशेष लक्ष देऊन आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोलापूरचे प्रेझेंटेशन केल्यास निश्चितच भविष्यात चायनासमोर आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म हबचा पर्याय निर्माण करू शकतो, असा विश्वास सोलापुरातील गारमेंट उद्योजकांनी व्यक्त केला.

कोरोना तसेच चायनाकडून भारतीय सैनिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात चायनाविरोधात चीड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देखील सोलापुरातील गारमेंट उद्योजकांनी चायनाच्या युनिफॉर्म उत्पादनावर बहिष्कर घातला पाहिजे, अशी भूमिका मांडली. 

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चायनाची मक्तेदारी आहे. युनिफॉर्म हबमध्ये देखील चायना वर्चस्व राखून आहे. चायनाकडून सर्वाधिक युनिफॉर्म आफ्रिका खंडात पुरवठा होतो. त्यानंतर भारतात देखील युनिफॉर्म तसेच रेडिमेड कपडे देखील पुरवठा होतो. बांगलादेशामार्फत चायना भारतात कपड्यांचा पुरवठा करतो. चीनला धडा शिकवण्याकरिता चीनची असलेली मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. त्याकरिता सोलापूरसारख्या गारमेंट हब होऊ पाहणाºया शहराला शासनाकडून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जागतिक मार्केटदेखील उपलब्ध करून दिली पाहिजे.

शहरात शेकडो गारमेंटचे काम घरगुती पद्धतीने चालतेसोलापूर रेडिमेड गारमेंट असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोचर म्हणाले, असोसिएशन अंतर्गत ३०० गारमेंट युनिट सभासद कार्यरत आहेत. तसेच इतर शेकडो गारमेंट शिलाई युनिट्स घरगुती कार्यरत आहेत. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये सोलापूरचे ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी आम्ही मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहोत. त्याकरिता आंतरराष्ट्रीय प्रदर्शनही भरवले. त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. स्कूल युनिफॉर्मपासून मिलिटरी, इंडस्ट्रीयल, एअरलाईन्स, फार्मसी कंपन्यांसह इतर शेकडो प्रकारच्या युनिफॉर्म तयार करण्याची कुशलता सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये आहे. येथील गारमेंट उद्योजकांमधील क्षमता वाढवण्याकरिता मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. त्यासोबत देशी आणि विदेशी मार्केटदेखील हवे आहे. मोठे निर्यात सुविधा केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र हवे आहे. सोलापूरचे युनिफॉर्म ब्रँड तसेच व्हॅल्यू वाढवण्यासाठी शासनाचा सक्रिय सहभाग हवा आहे. असे झाल्यास सोलापूर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठी झेप घेईल आणि चायनाला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो. 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग