शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सोलापूरकर रोज पितात सहा हजार लिटर मस्तानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:42 PM

संतोष आचलारे  सोलापूर : कडक उन्हाने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांची पावले दुपारच्या व सायंकाळच्या वेळी आपसूकच थंड पेय घेण्यासाठी वळत ...

ठळक मुद्देरोज एका गाडीवर ३०० ग्लासची विक्री; सर्वच प्र्रकारचे पेय स्वस्तात मिळाल्यामुळे गर्दीचिकू, पायनापल, आॅरेंज, अ‍ॅपल, डाळिंब, मोसंबी आदी प्रकारच्या ज्यूसबरोबरच आईस्क्रीमची विक्री मावा, फालुदा यासारख्या आईस्क्रीमलाही ग्राहकांची पसंती

संतोष आचलारे 

सोलापूर : कडक उन्हाने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांची पावले दुपारच्या व सायंकाळच्या वेळी आपसूकच थंड पेय घेण्यासाठी वळत आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी ग्राहकांची ही पेय पिण्यासाठी गर्दी होते. दररोज १०० हातगाड्यांतून जवळपास सहा हजार लिटर मस्तानीची विक्री होते. यासाठी ज्यूसलाच यंदाही ग्राहकांची पहिली पसंती दिसून येत आहे. त्यानंतर पायनापल, अ‍ॅपल व चिकू ज्यूसला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. मार्च महिन्यात गुरुवारी सर्वाधिक उन्हाचा पारा वाढल्याने सोलापुरातील नागरिक ज्यूस सेंटर व कोल्ड्रिंक सेंटरकडे जाताना दिसून येत होते. सात रस्ता, पार्क चौक, जुळे सोलापूर, विजापूर रोड, कोंतम चौक, टिळक चौक, अशोक चौक आदी परिसरातील ज्युस सेंटरवर येणाºया ग्राहकांची संख्या वाढताना दिसून येत होती. रस्त्यावरील हातगाडीवर वीस रुपये ग्लास याप्रमाणे पायनापल, लिंबू सरबत, रोज, सोडा आदी प्रकारचे पेय विकले जात आहे. स्वस्त पर्याय म्हणून या हातगाड्यांच्या भोवती ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. 

लिंबू सरबत व मस्तानी या दोन प्रकारच्या पेयांना या ठिकाणी सर्वाधिक पसंती मिळत असल्याची माहिती सात रस्ता येथील विक्रेत्याने दिली. 

उन्हाचा पारा वाढल्याने गल्लोगल्ली ज्यूस सेंटर  थाटत असल्याचे दिसून येत आहे. चिकू, पायनापल, आॅरेंज, अ‍ॅपल, डाळिंब, मोसंबी आदी प्रकारच्या ज्यूसबरोबरच आईस्क्रीमची विक्री होत आहे. मावा, फालुदा यासारख्या आईस्क्रीमलाही ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. 

दुकानात थाटलेल्या ज्यूसचा व आईस्क्रीमचा दर मात्र तीस रुपयांच्या पुढे असल्याने या ठिकाणी विशिष्ट ग्राहकांचीच गर्दी होताना दिसून येत आहे. जोडप्यांची उपस्थिती अशा दुकानात दिसून येत आहे. 

बर्फाशिवाय असणाºया थंड पेयांनाही पसंती

  • - बर्फ घालून करण्यात येणाºया शीतपेयांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याने अनेक ग्राहकांची बर्फाव्यतिरिक्त असणाºया अन्य थंडपेयांना पसंती मिळत आहे. 
  • - बर्फामुळे घसा धरणे, सर्दी होणे असे प्रकार होत असल्याने बर्फ न घालता थंड असलेल्या अन्य शीतपेयांना पसंती मिळत असल्याची माहिती कोंतम चौक येथील एका ज्यूस सेंटर चालकाने दिली. 
  • - आईस्क्रीम व कोल्ड्रिंकला अशा ग्राहकांची पसंती असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

रसवंती अजूनही ओसच

  • - उन्हाळा म्हटला की बर्फ घालून तयार केलेला थंडगार उसाचा रस सर्वांनाच आठवतो. थंडगार उसाच्या रसाची मागणी काही वर्षांपासून कमी होताना दिसून येत आहे. 
  • - उन्हाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही रसवंतीगृह अनेक विक्रेत्यांनी थाटले आहे, मात्र या रसवंतीच्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी मात्र तुरळक दिसून येत आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान