बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये; प्रणिती शिंदेंच्या नावे दादरला प्लॅट, १९ लाख रूपयांची दागिने
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 18, 2024 07:52 PM2024-04-18T19:52:39+5:302024-04-18T19:53:16+5:30
त्यांच्याकडे ३१ हजार २०२ रुपये रोख रक्कम असून त्यांच्या नावे एकूण ६ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांची संपत्ती आहे.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडूनप्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे ३१ हजार २०२ रुपये रोख रक्कम असून त्यांच्या नावे एकूण ६ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांची संपत्ती आहे.
त्यांच्याकडे ३०० ग्रॅम सोन्याची दागिने असून ज्याची चालू बाजारभावानुसार एकूण किंमत १९ लाख ६६ हजार ५०० रुपये इतकी आहे. १ कोटी ६८ लाख ९८ हजार १८० रूपयांची जंगम मालमत्ता असून ४ कोटी ९१ लाख ७२ हजार २२२ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. असे एकूण त्यांच्याकडे ६ कोटी ६० लाख ७० हजार रूपयांची संपत्ती आहे.
नाव : प्रणिती सुशीलकुमार शिंदे
वय : ४३
शिक्षण : एलएलबी, २००४ मुंबई विद्यापीठ
रोख रक्कम : ३१ हजार २०२ रुपये
जंगम मालमत्ता : १ कोटी ६८ लाख ९८ हजार १८० रूपये
स्थावर मालमत्ता : ४ कोटी ९१ लाख ७२ हजार २२२ रुपये
सोने : ३०० ग्रॅम, ज्याची किंमत १९ लाख ६६ हजार ५०० रूपये
एकूण मालमत्ता : ६ कोटी ६० लाख ७० हजार रुपये
दादरला प्लॅट : ४ फेब्रुवारी १९९९ साली प्रणिती शिंदे यांच्या नावे दादरला ६६० स्क्वेअर फुटाची प्लॅट खरेदी करण्यात आली. ज्याची त्यावेळची किंमत १ लाख ३२ हजार रुपये इतकी होती. सध्या प्लॅटची किंमत १ कोटी ५६ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
जनवात्सल्य बंगलाही त्यांच्या नावे : सात रस्ता येथील जनवात्सल्य बंगलाही प्रणिती शिंदे यांच्या नावे आहे. ७ जून २००६ साली सदर प्रॉपर्टी खरेदी करण्यात आली. त्यावेळी त्याची किंमत १५ लाख रुपये इतकी होती. त्यानंतर झालेल्या बांधकामाची किंमत गृहित धरून सध्या जनवात्सल्य बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये इतकी आहे.