शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

सोलापूर लोकसभा; मतदानाची प्रक्रिया राबविण्यासाठी १२ हजार ४५ कर्मचाºयांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:26 AM

व्हीव्ही पॅटच्या साह्याने मतदान कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. मतदार ओळख पटवून देण्यासाठी कोणती ओळखपत्रे चालतील, मशीनवर मतदान कशा पद्धतीने करण्यात यावे याबाबत मतदारांना त्यांच्या घरी माहिती पुस्तिका त्याचबरोबर मतदार यादीतील तपशीलसाठी स्लिपाही देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचत आहे.१६ एप्रिल रोजी प्रचाराची सांगता होणार, १८ एप्रिल रोजी यासाठी मतदानमतदान मशीन व निवडणूक कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी ३०० बस व ५९ जीपची व्यवस्था

सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मतदारसंघातील १ हजार ९६0 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यासाठी १२ हजार ४५ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान मशीन व निवडणूक कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी ३०० बस व ५९ जीपची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. १८ एप्रिल रोजी यासाठी मतदान घेण्यात येत आहे. १६ एप्रिल रोजी प्रचाराची सांगता होणार असल्याने उमेदवारांना आता केवळ प्रचारासाठी ९ दिवसच  शिल्लक उरले गेले आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट असणाºया सहा विधानसभा मतदारसंघात रोज किमान चार ते पाच सभा घेण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून दिसून येत आहे.

मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तसा उमेदवारांचा प्रचार एकीकडे वाढत आहे, तर दुसरीकडे मतदान पारदर्शक वातावरणात व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असताना दिसून येत आहे. निवडणूक कामातील अधिकारी व कर्मचाºयांना पुन्हा एकदा १0 एप्रिल रोजी प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, उमेदवारांच्या खर्चावर व त्यांच्या सभांवर नजरा ठेवण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. मतदान यंत्राची सर्व  व्यवस्था करणे, वाहनांची सुविधा निर्माण करणे, कर्मचारी व अधिकाºयांना आवश्यक सुविधा देणे, मतदारांना सुविधा देणे आदी कामांसाठी १३५ समन्वय अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय २२२ झोनल अधिकाºयांची नेमणूकही करण्यात आली आहे.

८३ मतदान केंद्रे वाढले

  • - ३१ जानेवारीनंतर घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मतदारांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे माढा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघात ८३ मतदान केंदे्र वाढली गेली आहेत. एकूण ३ हजार ५५३ मतदान केंदे्र दोन्ही मतदारसंघात असणार आहेत.
  • - अशी आहे तालुकानिहाय मतदान केंद्राची संख्या : करमाळा : ३३९,    माढा : ३४३, बार्शी : २२६, मोहोळ : ३३१, सोलापूर शहर उत्तर :२७९, सोलापूर शहर मध्य : ३0३,अक्कलकोट : ३५९, दक्षिण सोलापूर : ३२३, पंढरपूर : ३३१, सांगोला: २९६, माळशिरस : ३६८

मतदारांना घरी मिळणार माहिती पुस्तिका व ओळख स्लीपमतदारांना मतदानासाठी प्रेरणा मिळावी. व्हीव्ही पॅटच्या साह्याने मतदान कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. मतदार ओळख पटवून देण्यासाठी कोणती ओळखपत्रे चालतील, मशीनवर मतदान कशा पद्धतीने करण्यात यावे याबाबत मतदारांना त्यांच्या घरी माहिती पुस्तिका देण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील तपशीलसाठी स्लिपाही देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय