सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं सोलापूर मतदारसंघात भाजपने काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपचे शरद बनसोडे यांनी यांनी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे याचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यापुढे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे याच्या रूपानं भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. यंदा भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १ लाख ६५ हजार १०२ मतं मिळाली असून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्या पारड्यात १ लाख १७ हजार २४६ मतं पडली आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निकालाचे अपडेट निवडणुक निर्णय अधिकाºयांकडून वेळेत देण्यात येत आहे़ जसेजसे आकडे बाहेर येतील तशीतशी उमेदवारांची धाकधुक वाढत आहे़