सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील ‘शिंदे’शाहीचा गुरुवार २३ मे रोजी फैसला होणार होत आहे़ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे या दोन्ही ठिकाणी उभारलेल्या शिंदे या उमेदवारांची चर्चा महाराष्ट्रभर रंगली होती. दुपारी एकवाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी हे ६६ हजार १९१ मतांनी तर माढ्यातून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे १८ हजार ९५४ मतांनी आघाडीवर आहेत.
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस रामवाडी गोदामात सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला़ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भवितव्य कळणार आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी हे ६६ हजार १९१ मतांनी तर माढ्यातून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे १८ हजार ९५४ मतांनी आघाडीवर आहेत.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे व भाजपचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर यांच्यात लढत झाली़ या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही मतदारसंघात मतदान झाले तेव्हापासून निवडणूक निकालाबाबत लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तर माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. या दोघांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तर भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती़ त्यामुळे कोण सरस ठरणार हे दिसून येईल.