शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

सोलापूरच्या महापौरपद, उपमहापौर पदाची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 10:49 AM

एमआयएम तटस्थ, श्रीकांचना यन्नम यांचा मार्ग सुकर; उपमहापौरपदाकडे सर्वांचे लक्ष

ठळक मुद्देमहापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूकनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ काम पाहतीलभाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकास आघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी

सोलापूर : महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी मंगळवारी रात्री दिले. यामुळे महाआघाडीच्या गोटात खळबळ उडाली. भाजपच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे यातून स्पष्ट झाले. उपमहापौरपदाच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये निर्माण झालेला तिढा मंगळवारी कायम होता. त्यामुळे या निवडीकडे लक्ष असेल. 

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक होत आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ काम पाहतील. महापौरपदासाठी चार सदस्यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकास आघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. १०२ सदस्य असलेल्या महापालिकेत भाजपकडे सर्वाधिक ४९ सदस्य आहेत. भाजपनंतर शिवसेना २१, काँग्रेस १४, एमआयएम ९, राष्ट्रवादी ४ वंचित बहुजन आघाडी ३, बसपा १, माकप १ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस आणि एमआयएमचे दोन नगरसेवक तांत्रिक कारणांमुळे बुधवारी उपस्थित नसतील. १०० सदस्य उपस्थित राहिल्यास बहुमतासाठी ५१ सदस्यांची आवश्यकता असेल. भाजपला केवळ दोन सदस्यांची आवश्यकता आहे.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीने महाआघाडी केली. या महाआघाडीकडे बहुमत असल्याचा दावा करण्यात आला. काँग्रेसच्या नेत्यांनी एमआयएमला सोबत घेतल्याचे सांगितले. परंतु, एमआयएमने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारल्याने महाआघाडीची अडचण झाली. भाजपच्या गोटात आनंद झाला. श्रीकांचना यन्नम यांचा विजयाचा मार्ग सुकर दिसू लागला. 

बैठक सुरू असताना हैदराबादेतून आला निरोप - महाआघाडीसोबत जायचे की नाही, यावर चर्चा करण्यासाठी एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची मंगळवारी रात्री होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. यादरम्यान, एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी हैदराबाद येथून व्हिडीओ क्लीप पाठवून नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले. प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा हा आदेश असल्याचे बजावले. एमआयएमचे सर्व नगरसेवक या आदेशाचे पालन करतील, असे खरादी यांनी जाहीर केले.

आम्ही बंडखोरी करणारच : वल्याळ-उपमहापौरपदासाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपकडून राजेश काळे, नागेश वल्याळ, शिवसेनेचे अमोल शिंदे, भारतसिंग बडूरवाले, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, नरसिंग कोळी, एमआयएमच्या तस्लीम शेख, शाहजिदाबानो शेख यांचा समावेश आहे. काळे यांची निवड निश्चित मानली जात असली तरी नागेश वल्याळ बंडखोरीवर ठाम आहेत. वल्याळ यांच्यासोबत भाजपचे सात नगरसेवक आहेत. सात जणांनी वेगळी भूमिका घेतल्यास महाआघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.

वाल्याळ म्हणाले, आम्ही सात नगरसेवकांनी सकाळी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत देशमुख यांनी माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेनंतर राजेश काळे यांना माघार घ्यायला लावतो, असे सुभाष देशमुख म्हणाले. पुन्हा दुपारी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा फोन आला. त्यांच्यासोबत बैठक झाली. काळे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांना माघार घ्यायला लावणे चुकीचे होईल, असे सांगितले. आम्ही माघार घेणार नाही. पक्षानेच निर्णय घ्यावा, असे सांगून आम्ही उठून आलो.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस