शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अनुसूचित जाती समितीचे सोलापूर मनपावर ताशेरे

By admin | Published: June 23, 2017 2:06 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : मागासवर्गीयांसाठी शासकीय खात्यांमधील अनुशेष भरतीसह विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी शासनाने ६ हजार ३०० कोटींची तरतूद केलेली असताना केवळ ३ हजार कोटी खर्च केला जातो अशी आकडेवारी समोर आली आहे. सोलापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात जिल्हा परिषद प्रशासनाने जशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्याहून अधिक प्रकार सोलापूर महापालिकेतही आढळून आला. महापालिकेने मागासवर्गीयांच्या अनुशेष भरतीसाठी अनास्था दाखवली. विविध योजनांसाठी असलेला १४ कोटींचा सेस खर्च केला नसल्याबद्दल अनुसूचित जाती कल्याण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.समितीचे प्रभारी प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करताना संबंधितांना सूचना केल्या. हा अहवाल समिती सदस्यांपर्यंत पोहोचवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गुरुवारी पत्रकारांना सांगितले. अक्कलकोट तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या वाटपामध्ये सावळा गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. सर्वच ठिकाणी आरक्षण, पदोन्नती, कल्याणकारी योजनांबद्दल फारसे समाधानकारक चित्र नसल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मिळालेल्या माहितीनुसार भरतीची प्रक्रिया रिक्त असल्याचे दिसले. यावर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी शासनाची परवानगी घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात घट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय खात्यांमधील अनुशेष भरती, कल्याणकारी योजनांच्या कामांची पाहणी करण्यासाठी २० ते २२ जून अशी तीन दिवस महाराष्ट्र शासन अनुसूचित कल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यासाठी समितीचे प्रमुख डॉ. सुरेश खाडे यांच्यासह प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, रमेश बुंदीले, डॉ. सुजित मिणचेकर, लखन मलिक, सुभाष साबणे, हरीश पिंगळे या आठ जणांचा समावेश होता. तीन दिवसांच्या दौऱ्यात समितीच्या आठ सदस्यांचा दौऱ्यांमध्ये तीन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात डॉ. सुरेश खाडे व डॉ. सुचित मिणचेकर यांनी मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील पाहणी केली. दुसऱ्या गटात प्रा. जोगेंद्र कवाडे, हरीश पिंगळे, लखन मलिक यांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील विविध खात्यांची पाहणी केली. लोकांची मते जाणून घेतली. तर तिसऱ्या गटातील सुभाष साबणे, प्रकाश गजभिये, रमेश बुंदीले यांनी करमाळा, माढा, बार्शी,माळशिरस तालुक्यात पाहणी केली. -------------------सर्व खात्यात अनुशेष भरण्याबद्दल अनास्थाअनुसूचित जाती कल्याण समितीने तीन दिवस केलेल्या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस ठाणे, सोलापूर विद्यापीठ यासह विविध कार्यालयांना भेटी देऊन मागासवर्गीयांचा अनुशेष भरला आहे याची पाहणी करताना सर्वच खात्यामध्ये याबद्दल अनास्था असल्याचे आढळून आल्याचे समितीचे सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. मागासवर्गीयांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. बोगस कागदपत्रांद्वारे लाभाथ्याशिवाय दुसऱ्याच व्यक्तीला लाभ देण्याचे प्रकार आढळून आले. या सर्व बांबींच्या आम्ही नोंदी घेतल्या आहेत. संबंधितांना सचिवांसमोर साक्ष होऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे समिती सदस्यांनी पत्रकारांना सांगितले. -----------------------प्राचार्य-कुलगुरु पदासाठी आरक्षण हवेजिल्ह्यात पाहणीसाठी गेलेल्या अनु. जाती कल्याण समितीला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पदोन्नती, अनुशेष भरतीबद्दल गाऱ्हाणी मांडताना प्राचार्यपदासाठी आरक्षणाची मागणी केली. सोलापूर विद्यापीठातून कुलगुरु पदासाठीही १३ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.