शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

सोलापूर महापालिकेला मिळेना आरोग्य अधिकारी, साथीबाबत संताप नागरिकांत संताप, महापौरांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:21 AM

शहरात पसरलेल्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सक्षम आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देतातडीने आरोग्य अधिकारी उपलब्ध करण्याची मागणीसक्षम आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईतसाथीच्या रोगांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपाची यंत्रणा कमी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : शहरात पसरलेल्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सक्षम आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली आहे. मंगळवारी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साथीच्या रोगांकडे लक्ष वेधून तातडीने आरोग्य अधिकारी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. शहरात फैलावलेल्या स्वाईन फ्लू, मलेरिया, चिकुनगुन्या व डेंग्यूच्या साथीबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. डेंग्यू संशयित आजाराने बळी गेलेल्याची माहिती देऊनही आरोग्य विभाग ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाही. डेंग्यू व स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. करणराज पोळ (वय ८, रा. क्रांतीनगर, निराळेवस्ती) येथील बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला. असे असताना  एनआयव्हीकडून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूने मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही, असा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यू उपचार महागडे आहेत. मनपाने उपचाराची व्यवस्था करावी अशी आमदार शिंदे यांनी मागणी केली आहे. काँग्रेस  महिला शहर अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त डॉ. ढाकणे यांना निवेदन दिले. याप्रसंगी माजी महापौर नलिनी चंदेले, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, रेणुका मंजुळकर, लता गुंडला आदी उपस्थित होते. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांच्या कारभाराला वैतागून सभेने त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव मंजूर केला आहे. पण हा पदभार घेण्यास कोणी तयार नाही. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील एका डॉक्टरास खास विनंती करून सोलापूरला आणण्याची तयारी केली होती. आरोग्य सचिवांना बोलून त्यांनी बदलीची फाईल हलविली. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही फाईल गेल्यावर त्या डॉक्टराची दुसरीकडे बदली करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दुसरे नाव सुचविण्याबाबत कळविण्यात आले. दोन महिने प्रयत्न करून असा खेळ झाल्याने आयुक्त डॉ. ढाकणे नाराज झाले तर इकडे आरोग्य विभागाची वाट लागली आहे. आरोग्य अधिकाºयाला असलेला कमी पगार, जादा जबाबदारी यामुळे कोणाची तयारी होत नसल्याचे दिसून येत आहे. -----------------------आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी केले लक्ष्यआरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी लक्ष्य केल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी तडक मुंबईला धाव घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्याची आणीबाणी लक्षात घेऊन तातडीने सक्षम आरोग्य अधिकाºयाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दुहेरी जलवाहिनीसाठी जादा ३५0 कोटीचा निधी, एनटीपीसीची योजना मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता पदावर जीवन प्राधिकरणाकडील अभियंत्याची नियुक्ती, भाडेकराराने गाळ्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. या मागण्यांचे निवेदन देताना शिक्षण मंडळाचे माजी सदस्य दत्तात्रय गणपा, श्रीशैल बनशेट्टी आदी उपस्थित होते.