साेलापूर : महापालिकेचा समाजकल्याण विभाग शहरातील दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर राेजी व्हिडीओ काॅन्फरन्सव्दारे हाेणार आहे. शहरात दिव्यांगांची संख्या ८ ते १० हजारांच्या आसपास आहे. मनपाकडे केवळ २,५०० जणांची नाेंद आहे. त्यामुळे अनेकांना शासकीय याेजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. या प्रस्तावावर २० सप्टेंबर राेजी निर्णय हाेण्याची शक्यता आहे.
शासनाच्या विशेष निधीतून मार्कंडेय जलतरण तलावालगतच्या जागेत अभ्यास केंद्र उभारण्यासाठी ९५ लाखांचा निधी मिळाला आहे. शुभराय आर्ट गॅलरीची नवी इमारत बांधण्यासाठी २ काेटी ८३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या कामांच्या कार्यारंभ आदेशाचा प्रस्तावही सभेच्या अजेंड्यावर आहे.
----
कल्याण नगर रस्त्याला शिवभक्त बेडर कन्नपांचे नाव
हाेटगी राेड ते कल्याण नगर रस्त्याला संत शिवभक्त बेडर कन्नपा यांचे नाव देण्याचा सभासद प्रस्ताव वैभव हत्तूरे, सुनील कामाटी यांनी दिला आहे. आयएमएस शाळा ते सैफुल यादरम्यानच्या लक्ष्मीनगर ते श्रीनगर या रस्त्यांना जाेडणाऱ्या चाैकाचे शाकंभरीदेवी चाैक असे नामकरण करण्याचा प्रस्तावही उपमहापाैर राजेश काळे, अविनाश बाेमड्याल यांनी दिला आहे.