सोलापूर : मनपा परिवहन समिती सभापतीची निवडणूक आज १६ मार्च रोजी होणार आहे़ याबाबतची प्रक्रिया महापालिकेत सुरू झाली आहे़ या पदाची लॉटरी कुणाला लागणार, याबाबत सत्ताधाºयांबरोबर विरोधकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी परिवहन समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पदासाठी बुधवार, दि. १४ मार्च रोजी नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. परिवहन समितीमध्ये भाजपचे ६ तर विरोधी पक्षाचे ६ सदस्य आहेत. स्थायी समितीच्या सभापतीला या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे गतवेळेस परिवहन सभापतीपदी भाजपचे दैदीप्य वडापूरकर यांची निवड झाली. यावेळेस मात्र स्थायी सभापतीपदाची निवडणूक न झाल्याने पेच निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान मते पडणार असल्यामुळे चिठ्ठीद्वारे सभापतीपदाचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधाºयांची पंचाईत झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, संजय कोळी, नागेश वल्याळ यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी परिवहन समितीच्या सदस्यांची बैठक झाली. परिवहन सदस्यांना भाजपतर्फे व्हिप देण्यात आला आहे. मावळते सभापती वडापूरकर वगळता इतर पाच जणांचे सभापतीपदासाठी अर्ज भरून घेण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ऐनवेळी पक्षाकडून जे नाव येईल, त्यांची उमेदवारी भरण्याची तयारी करण्यात आली आहे. परिवहन समिती सभापतीपद सहकारमंत्री गटाला आहे. यावेळेस सरगम यांच्या नावाची चर्चा आहे.
विरोधी पक्षात शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे दोन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. गटनेत्यांनी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याकडे भाजपच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या तयारीबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर पक्षाकडून परवानगी मिळाल्यावर धोरण ठरविले जाणार असल्याचे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सांगितले.
सत्ताधाºयांचे टेन्शन वाढलेस्थायी समिती सभापतीपदी उमेदवारी भरताना झालेल्या गोंधळामुळे निवडणूक न्यायप्रक्रियेत अडकली. स्थायी समितीच्या सभापतीला परिवहन सभापतीपदासाठी मत देण्याचा अधिकार होता. हे एक मत हातचे गेल्यामुळे सत्ताधाºयांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे विरोधी गटनेत्यांबरोबर महापौर शोभा बनशेट्टी यांनीही स्थायी सभापतीची निवडणूक झाल्यावर परिवहनची निवडणूक घ्यावी, असे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे.
पण एकदा निवडणूक जाहीर केल्यावर वेळापत्रक पुढे ढकलणे अवघड असते. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीत हा वाद कचाट्यात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विभागीय आयुक्त हा धोका पत्करणार नाहीत, हे ओळखून सत्ताधारी परिवहनच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.