शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

सोलापूर महापालिकेचे दुर्लक्ष ; विनापरवाना खोदले जाताहेत रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:45 PM

अधिकारी बेफिकीर: खड्डे बुजविण्यासाठी मोठा खर्च

ठळक मुद्देशहरात नव्याने झालेले खड्डे विनापरवाना खोदण्याचे प्रकार वाढले विनापरवाना या रस्त्याची खोदाई करण्यात येत असल्याचे दिसून आले महापालिकेचे मोठे नुकसान तर सामान्य नागरिकांना नाहक त्रास

सोलापूर : शहरात नव्याने झालेले खड्डे विनापरवाना खोदण्याचे प्रकार वाढले आहेत. नगरअभियंता कार्यालयास कोणतीही कल्पना न देता शहरात सुटीच्या दिवशी खोदकाम उरकले जात असून, याकडे संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या प्रभागात रेल्वे लाईन्समध्ये नगरोत्थानमधून नव्याने करण्यात आलेला रस्ता केबल टाकण्यासाठी खोदण्यात आला. नवीन रस्ता खोदण्यात येत असल्यामुळे नगरसेविका फुलारे यांना शंका आली. त्यांनी नगरअभियंता कार्यालयात या रस्त्याच्या खोदाईची परवानगी घेण्यात आली आहे काय याची खातरजमा केली. त्यावेळी विनापरवाना या रस्त्याची खोदाई करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर आयुक्तांनी चौकशी करून रिलायन्सला दंड केला.

 शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नवीन रस्ते खोदले जात आहेत. पण कोणीच लक्ष देत नसल्याने महापालिकेचे मोठे नुकसान तर सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

जुळे सोलापुरात सैफुल ते बॉम्बे पार्क असा नवीन रस्ता तयार करण्यात आला. ड्रेनेज जोडकामासाठी रस्ता जागोजागी खोदण्यात आला. त्याचबरोबर सैफुल ते आयएमएस स्कूल रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे.  याशिवाय विजापूर महामार्गाच्या डाव्या बाजूने ड्रेनेजलाईनसाठी खोदाई करण्यात आली. पण खड्डे अर्धवट बुजविण्यात आले. पावसामुळे हे खड्डे मोठे होऊन अपघातास कारणीभूत बनले आहेत. ड्रेनेज जोडणीसाठी सुटीदिवशी व रात्री-अपरात्री रस्ते खोदले जात आहेत. याकडे महापालिकेच्या झोन किंवा               संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. 

गणेश सोसायटीत रस्ता खोदला- जुळे सोलापुरातील गणेश सोसायटी, रजनी पार्क, लक्ष्मी सोसायटी, ज्ञानेश्वरनगरकडे जाणारा रस्ता नगरोत्थान योजनेतून नव्याने करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या पावसात सोसायटीचे पाणी साचले. त्यामुळे ड्रेनेजलाईन तुंबल्याने नवा रस्ता खोदून पाईप घालून पाण्याला मार्ग काढण्यात आला. रस्ता करताना याबाबत काळजी घेतली नाही. तसेच रस्ता खोदताना नगरअभियंता कार्यालयाची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. आता नव्याने नगरोत्थान योजनेतून रस्ते करण्यात येत आहेत. किमान या रस्त्यासाठी तरी कडक नियमावली करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 

नगरोत्थानमधून केलेले डीपी रस्ते तीन वर्षे खोदायचे नाहीत असा दंडक आहे. अत्यावश्यक पाणीपुरवठा व ड्रेनेजलाईनसाठी क्वचित रस्ते खोदावे लागतात. पण आता आयुक्तांनी या दोन्ही बाबी झाल्याशिवाय रस्ते करण्यास परवानगी देऊ नयेत असे आदेश दिले आहेत.जुळे सोलापुरातील रस्ता खोदताना परवानगी घेतलेली नाही.   -संदीप कारंजे प्रभारी नगरअभियंता

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा