शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

सोलापूरात राष्ट्रवादीचे तोंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 4:14 PM

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी गांधी जयंतीचे औचित्य साधून रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला आणि दंडाला काळ्या ...

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या धोरणांचा निषेधराष्ट्रवादीच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचाही पाठिंबाराष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी गांधी जयंतीचे औचित्य साधून रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला आणि दंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साळुंखे - पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, माजी आमदार  युनूसभाई शेख, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, गटनेते किसन जाधव यांच्यासह युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू कुरेशी, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, महिला आघाडी शहराध्यक्ष नगरसेविका सुनीता रोटे, महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे, राजन जाधव, पद्माकर काळे, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, मल्लेश बडगु, बशीर शेख, सुहास कदम, विष्णू निकंबे, ज्ञानेश्वर सपाटे, दिलावर मणियार ,गोवर्धन सुंचू , राजेश अच्युगटला , संतोष कासे,तणवीर गुलजार, अमीर शेख,शाम गांगर्डे, प्रकाश जाधव, संजय सरवदे, डॉ. दादाराव रोटे, महंमद इंडीकर, अ‍ॅड ,सादिक नदाफ , लक्ष्मण भोसले,रमीज कारभारी,प्रसाद कलागते ,केरप्पा जंगम,जनार्दन बोराडे, युनूस मुर्शद, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, मारुती जंगम, हेमंत चौधरी, गणेश पाटील, प्रशांत बाबर, वंदना भिसे, शोभा गायकवाड, सुनीता गायकवाड, मार्था आसादे, सिया मुलानी, गौरा कोरे, सुनंदा साळुंखे, राठोड, मनीषा नलावडे, सोपान खांडेकर, मौला शेख, महेश कुलकर्णी, मैनु इनामदार, प्रवीण कारमपुरी, मुस्ताक पटेल, सुनील जाधव,अनिल उकरंडे, संगीता मोरे, मानसी बापटीवाले, छाया जगदाळे,रुपेश भोसले,अहमद मासूलदार,फारूक मटके,प्रवीण साबळे,अ‍ॅड. विकास जाधव, संजय मोरे,पांडुरंग आवाल,बंदेनवाज कोरबू,स्वामीनाथ पोतदार,सुधीर भोसले, गुलाब मुलानी, विजय काळे, सचिन कदम, अख्तरताज पाटील,विलास चेळेकर, भारत सोरेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

आंदोलनाच्या प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. राष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सत्य, अहिंसा आणि शांती राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची तत्वे. राष्ट्रवादीने मात्र सत्य ऐवजी असत्य अर्थात ( राफेल विमाने बनविण्याची ऌअछ कंपनीची क्षमता नाही ),अहिंसा ऐवजी हिंसा अर्थात (विचारवंतांच्या हत्येस जबाबदार सनातन संस्थेवर अद्याप बंदी नाही ) आणि शांती ऐवजी अशांती अर्थात देशाच्या संविधानाचा अपमान करणाºयांना तत्काळ अटक करण्यात यावी हा मजकूर फलकावर लिहून सत्ताधारी पक्षाची आज हि तत्वे असल्याचे सांगत सरकारच्या कारभाराची सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणातून चिरफाड केली. 

काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा ----महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरणे आंदोलनात  काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर अलका राठोड आदींनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून राष्ट्रवादीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. 

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसStrikeसंप