- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : स्थळ महापालिकेतील इंद्रभुवन..कै. आप्पासाहेब वारदांच्या पुतळ्याभोवती फोटो काढत असलेले दोन परदेशी पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत होते...महापालिकेचे कर्मचारी, शिपाईही उपस्थित होते...अशातच माध्यमातील पत्रकारांनी त्यांची माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली अन् त्यातील एकाने सांगितले की, माझे आजाेबा ब्रिटिशकाळात डफरिन हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन होते. त्यांनी एका पुस्तकात महापालिकेच्या इमारत, डफरिन हॉस्पिटलचा उल्लेख होता. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी मी इंग्लंडहून आल्याचे सांगितले.
ब्रिटिश काळात १८८४ ते १८८६ दरम्यान सिव्हिल सर्जन म्हणून विल्यम स्क्रोजी हे डफरिन हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली होती. यादरम्यान डॉ. विल्यम यांना सोलापुरात दोन अपत्य झाली होती. २३ जुलै १८८४ मध्ये त्यांना पहिले अपत्य लाऊड हे जन्माला आले, त्यानंतर १२ जुलै १८८६ मध्ये दुसरे अपत्य रिथ यांचा जन्म झाला. त्यानंतर विल्यम हे आपल्या परिवारासह पुन्हा इंग्लंडला स्थायिक झाले. दरम्यान, डॉ. विल्यम्स यांची नात हेलन काईट (वय ६५) यांनी आपल्या आजोबाच्या सोलापुरातील कार्यस्थळ असलेल्या डफरिन हॉस्पिटलची आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे त्या सोलापुरात आल्या. हेलन काईट यांच्या समवेत इंग्लंडमधील निवृत्त शिक्षिका एन. अंडरहिल उपस्थित होत्या.इंग्लंडकडूनही देणार मदत...नात हेलन काईट घ्या इंग्लंडमध्ये निवृत्त नर्स आहेत. सोलापुरातील डफरिन हॉस्पिटलचे ठिकाण दर्शवणारा नकाशा व तत्कालीन तारखांच्या माहितीसह सोलापुरात आल्या. सोलापूर महापालिकेत येऊन डफरिन हॉस्पिटलसंदर्भात माहिती घेतली आणि त्यांनी हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट दिली. आजोबांनी ज्या ठिकाणी काम केले त्या भूमीला भेट दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. इंग्लंडमधील संस्थानकडून डफरिन हॉस्पिटलसाठी काही मदत देता आली तर प्रयत्न करू, अशी ग्वाही हेलन काईट यांनी दिली.
इंद्रभुवनच्या इमारतीचे केले कौतुकसोलापूर भेटीदरम्यान हेलन काईट यांनी महापालिकेत येऊन इंद्रभुवनच्या इमारतीची माहिती घेतली आणि परिसराची पाहणी केली. एवढी मोठी जुनी आणि भव्य इमारत पाहून त्यांनी या इमारतीचे कौतुक केले.