शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Solapur | पाटकूलजवळ उजनीचा कालवा फुटला, गाळाने विहीरी बुजल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 2:32 PM

मोठ्या जलप्रवाहामुळे पिके पाण्यात

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथून जाणारा उजनीचा डावा उजवा कालवा सकाळी सहा वाजता खरात वस्ती येथे फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुटलेला हा कालवा साधारण ५० वर्षांहून जुना आहे.

मोहोळसह पंढरपूर तालुक्यातील शेकडो एकरातील पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. तसेच  जवळपास चार ते पाच विहीरींमध्ये गाळ जाऊन पुर्ण भरलेल्या आहेत. काढणीला आलेले द्राक्ष, डाळिंब या फळपिकांसह ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके पूर्णपणे पाण्यासाठी गेली आहेत. शिवाय अनेकांच्या घरामध्येही पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे.

उजनीतून पाणी साेडण्यात आल्यामुळे सुमारे तासभर पाण्याचा प्रवाह वेगाने सुरूच होता. उजनीतून पाणी सोडणे बंद केल्यानंतरही वाहत गेले. दुपारी १२ वाजल्यानंतर उजनी कालव्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. महसूल प्रशासनाला माहिती देऊन नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहे. नुकसानीचा आकडाही मोठा असणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर