रात्री 12:00 ते 12:30- अंत्रोळीकर नगर - पुना नाका - भैय्या चौक-सात रस्ता-दमाणी नगर
रात्री जेवण करून बाहेर फिरणाºयांची संख्या अलीकडच्या काळात वाढते आहे. गेल्या दोन दिवसांत थंडीचे वाढते प्रमाण पाहता या काळात ही संख्या रोडावली असली तरी अजूनही बºयाच ठिकाणी नागरिक, युवक बाहेर फिरताना दिसून आले. सोलापूर शहर आणि जुळे सोलापूरचा भाग या ठिकाणी रात्री फिरताना ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. यामध्ये पुरुषांसोबत महिलांचेही प्रमाण तितकेच आहे. हल्लीच्या काळात कामाच्या घाईगडबडीमुळे रात्री उशिरा होत असलेले जेवण आणि त्यानंतर शतपावली करण्यासाठी ही मंडळी फिरताना दिसून येतात. शहरातील जुन्या चाळींच्या परिसरात मात्र नागरिक लवकर झोपतात. त्यामुळे या भागात लोकांचा शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे रात्रीची शांतता या परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसून आली. अर्थात वाढती थंडीही याला कारणीभूत आहे, हेही तितकेच खरे. अर्धवट झोपेत असणारा हा काळ असल्याने कमी-अधिक प्रमाणात नागरिक रस्त्यावर गप्पा मारताना दिसून आले.
जेवणानंतर शतपावली; जुन्या मैत्रीच्या आठवणीरात्री बारा वाजता, उत्तरायणाच्या पूर्वसंध्येला स्वच्छ वातावरण आणि प्रकाशही भरपूर अशी स्थिती. अशा वेळी अंत्रोळीकर नगरमधील रस्त्याच्या कडेला टाकलेल्या बाकांवर चार मित्र बसलेले. अगदी गप्पा मारत. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना या चारही मित्रांना आयुष्याविषयी फारशी काळजी दिसत नव्हती. थंडी असतानाही स्वेटर आणि मफलर गुंडाळून हे मित्र बसले होते. वय झालेले असले तरी त्यांच्यातील बालपण अजून गेलेले नव्हते. रात्री १२ वाजताही ते आपल्या मित्रांचा सेल्फी घेण्यात मग्न होते. तांत्रिक गोष्टींचाही आनंद हे मित्र घेताना दिसून आले.
गिºहाईक येईपर्यंत काय करायचे ?, त्यासाठी शेकोटी करून बसलोयदिवसा गजबजलेली नवीपेठ रात्री सुनसान होती. चिटपाखरूही या भागात दिसून आले नाही. एका ठिकाणी सुरक्षारक्षक बसलेला होता. सोलापूर एस. टी. बसस्थानकाचा परिसर हा नेहमीच वर्दळीचा. रात्री ये-जा करणारे लोक कमी असतात, त्यामुळे रिक्षाचालकांनाही गप्पा मारायला वेळ मिळतो. मग थंडीच्या दिवसात शेकोटी करून गप्पा मारणारे रिक्षाचालक, प्रवासी आणि ट्रॅव्हल एजंट बसलेले दिसले. रात्रीची वेळ असली तरीही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. स्टँडबाहेरच्या कँटीनवर लोक चहा प्यायला गर्दी करून होते. पुढे पुणे नाक्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी पोलीस नाकाबंदी करण्यासाठी होतेच. येणाºया-जाणाºया गाड्यांची चौकशी ते करीत होते. याच वेळी एका जीपमधून काही लोक उतरले. त्यांना आपल्या घरी जायचे होते. यात महिला आणि झोपलेली लहान मुले घेऊन हे लोक घरी जाणार होते.
अहो, आमचे हे कामच आहे, सुरक्षेचेपोलीस म्हटले की ड्यूटी टाईम नाही. अगदी कधीही आदेश आला की कामावर हजर राहावेच लागते. सध्या पोलिसांना नाकाबंदी करण्याचे आदेश असल्याने सात रस्ता परिसरात पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार आणि इतर पोलीस सात रस्त्याजवळ नाकाबंदी करताना दिसून आले. इतक्या थंडीतही काम करावेच लागते, आपली ड्यूटी चुकली नाही, हेच त्यांना सांगावेसे वाटले. महिला पोलीस उपनिरीक्षक यांनाही रात्रीच्या नाकाबंदीची ड्यूटी असल्याने त्याही दक्ष स्वरूपात इतर पोलिसांना कामाविषयी जाणीव करून देत होत्या. इतर पोलीसही विजापूर, होटगी रोडवरून येणाºया वाहनांची तपासणी करण्यासाठी सज्ज होते. हातात काठी, त्याशिवाय त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले बॅरिकेडिंग घेऊन आलेल्या गाड्या अडवून त्यांची चौकशी करण्याचे काम करीत होते. रात्री उशिरापर्यंत हे काम करावे लागणार आहे. हे काम संपल्यानंतरच सुट्टी मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. थंडी असो वा पाऊस आम्हाला आमची ड्यूटी करावीच लागते, असेही या पोलिसांनी सांगितले.
ओ गाडी जातेय का बघाकी ? आम्हालाही गावाला जायचे आहे.भैय्या चौकात मंगळवेढ्याकडे जाणारे काही प्रवासी थांबले होते. त्या रस्त्यावर जाणाºया गाड्यांना हात करून गावी जाण्याबाबत चालकांना विचारत होते. याच परिसरात असणाºया अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ड्यूटीवर असणारा पोलीसही पाहरा करीत उभा होता. रोज ड्यूटीवर असणारे पोलीस आज सुटीवर असल्याने आपली आज इथे ड्यूटी लागल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात रात्री हॉटेलमध्ये काम संपवून घरी जाणारे कर्मचारीही दिसले. कितीही रात्र झाली तरी काम संपवूनच घरी जावे लागते. महिलांनाही रात्री उशिरा घरी जावे लागते, जायला वाहन नसल्याने अधिक अडचण होते, असे या कर्मचाºयांनी सांगितले.
रात्र पाळीत ड्यूटी असल्याने थांबलो आहेभैय्या चौकाकडून दमाणी नगर, मरिआई चौकाकडे जाताना इंद्रधनू प्रकल्पाच्या बाहेर सुरक्षेसाठी थांबलेला गार्ड बाहेर पत्र्यावर लाकडे जाळून शेकोटी करीत थांबला होता. तीन पाळ्यांमध्ये काम चालते. प्रत्येक पाळीत दोघे जण काम करीत असतात. एकूण सहा जण काम करीत असतात. काल रात्री खूप थंडी होती, आता ती कमी झाली असल्याचे यावेळी उपस्थित असणारे गोलंदाज म्हणाले. गवळी गल्ली परिसरात असणाºया मंदिराबाहेर एक जण झोपलेला होता. लक्ष्मी-विष्णू मिलच्या रस्त्यावर काही युवक गप्पा मारीत उभे होते. मरिआई पोलीस चौकीतही फारशी वर्दळ नव्हती. पुढे दुपारी गर्दी असणारे सुपर मार्केटही अगदी सुनसान झालेले होते. काही कुत्र्यांचा कलकलाट मात्र मोठ्या प्रमाणावर होता.