शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

आयोगानं नियमावली तयार न केल्यामुळे गोशाळांना निधी अन् कर्मचारी मिळेना

By appasaheb.patil | Published: June 10, 2024 7:15 PM

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार नाही केली

सोलापूर : राज्यातील गोशाळांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन एप्रिल २०२३ मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गंठन केले. त्याचप्रमाणे गोसेवा आयोगा सोबतच गोशाळांना अनुदान करता १०० कोटी रुपये मंजूर केले, परंतु पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळे एक वर्ष होऊन सुद्धा आयोगाला कोणते अधिकार, १०० कोटी निधी व मंजूर कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नसल्याने राज्यातील सर्व गोशाळांचे खूप मोठे नुकसान झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वांद यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

शासनाने गोशाळा बांधकामाकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित ही योजना कार्यान्वित केली सर्व शासकीय नियमानुसार गोशाळा कडून प्रस्ताव मागविण्यात आले. या प्रस्तावाची पशुसंवर्धन विभाग मार्फत तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र निवड समितीद्वारे राज्यातील १८२ गोशांची निवड करण्यात आली. शासन निर्णयानुसार गोशाळांना निधी मंजूर करण्यात आला परंतु पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या चुकीच्या धोरणामुळे मंजूर निधी वितरणात विलंब करून तो शासनाकडे परत पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा गोसेवकांनी सोलापुरात दिला. यावेळी गोशाळा महासंघाचे अध्यक्ष महेश भंडारी, उद्योजक केतन शहा यांच्यासह सर्व गोशाळा ट्रस्टी, संचालक, गोरक्षक, गोसेवक, गोपालका व अन्य लोक उपस्थित होते.

या आहेत गोसेवकांच्या शासनाकडे मागण्या

- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरीत वितरीत करण्यात यावा- गोसेवा आयोगाला कर्मचारी व इतर त्यांचे अधिकार देण्यात यावे.- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात यावी- सर्व गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश १०० रू. प्रमाणे चारा अनुदान त्वरीत देण्यात यावे- संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी साठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.- पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची त्वरीत बदली करण्यात यावी-  गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार