अरुण बारसकरलोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : पीक पद्धती बदलली तरी ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हाच आहे, यावर याही वर्षीच्या पेरणी अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी होऊन ज्वारीचा ‘सोलापुरी ब्रँड’ कायम आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळत आहे.
सरासरी क्षेत्र ५ जिल्ह्यांतपाच हजार हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले राज्यात ६ जिल्हे, एक हजाराच्या खाली सरासरी क्षेत्र असलेले ५ जिल्हे, तर २० हजार हेक्टरपेक्षा कमी ज्वारी क्षेत्र चार जिल्ह्यांत आहे.
सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, बाजरीचे पीक चांगले येते. त्यामुळे प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यास वाव आहे. जिल्ह्यात ‘हुरडा’ व कृषी पर्यटन वाढतेय. १० गुंठ्यांत ८० ते ९० हजारापर्यंत उत्पादन होते. - डाॅ. लालासाहेब तांबडे, मुख्य शास्त्रज्ञ, सोलापूर विज्ञान केंद्र