- शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील 17 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचाही या संपात सहभाग आहे. जिल्हा परिषदेतील बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोश कुलकर्णी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहीले असून हे पत्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे.
संप पुकारल्याने विभाग प्रमुख या नात्याने कार्यकारी अभियंता संतोश कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांना काही बाबी निदर्शनात आणून दिल्या आहेत. त्यांच्या पत्रात पुढील बाबी नमूद केल्या आहेत... ही बाब गैरवर्तणुक समजण्यात येईल व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. आपण संपात सहभागी न होता, कार्यालयात उपस्थित रहावे. रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर यावे. संपात सहभागी झाल्यामुळे सेवेत खंड पडू शकतो. याचीही नोंद घ्यावी. तरीही आपण संप करु नये ही कळकळीची विनंती.
पत्राचा कर्मचारी संघटनेकडून निषेधजुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप पुकारण्यात आला आहे. या संपास अधिकारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. पेन्शन लागू करण्यासाठी राज्यातील सर्वच कर्मचारी संपावर आहेत. मात्र, कुठल्याही अधिकाऱ्याने असे पत्र लिहीले नाही. त्यामुळे या पत्राचा आम्ही निषेध करतो. हे पत्र मागे घेण्याची आम्ही त्यांना विनंती करु. नाहीतर कर्मचाऱ्यांचा उद्रेक होईल, असे जिल्हा परिषदेतील लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे यांनी सांगितले.