शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

Solapur: मुदतीत ऑनलाइन परीक्षा फॉर्म न भरलेल्यांना ऑफलाइनची संधी, सोलापूर विद्यापीठाचा निर्णय

By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 17, 2023 6:40 PM

Solapur: ऑनलाइन परीक्षा फॉर्म न भरल्यास त्यांचे ऑफलाइन परीक्षा अर्ज भरून घेऊन त्यांच्या पीएनआर क्रमांकावरून त्यांना परीक्षेला बसण्याची सोय करण्यात येणार असल्याने एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवार, १९ जून पासून सुरू होत असून काही विद्यार्थ्यांचे आरआर (डबल आर), गैरहजर व अन्य तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन परीक्षा फॉर्म न भरल्यास त्यांचे ऑफलाइन परीक्षा अर्ज भरून घेऊन त्यांच्या पीएनआर क्रमांकावरून त्यांना परीक्षेला बसण्याची सोय करण्यात येणार असल्याने एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

मार्च-एप्रिल २०२३ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ जूनपासून सुरुवात आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ च्या परीक्षेतील निकाल ज्या विद्यार्थ्यांचे डबल आर, गैरहजर, शून्य गुण होते, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करून ऑनलाईन परीक्षा फॉर्म महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे  ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ च्या परीक्षेतील निकाल तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असल्यास त्यांचे परीक्षा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म संबंधित महाविद्यालयीन पातळीवर ऑफलाईन भरून घेऊन त्यांना पीएनआर क्रमांकावरून परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिका, उपस्थिती अहवाल, महाविद्यालयाच्या पत्रासह स्वतंत्रपणे मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रावर जमा करण्यात यावी, अशी सूचना देखील विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने काढलेल्या परिपत्रकात केली आहे.

टॅग्स :examपरीक्षाSolapurसोलापूर