शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

Solapur: अरे देवा, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची खुर्ची घाण पाण्यात ठेवली ? जाणून घ्या नेमकं कारण 

By appasaheb.patil | Published: July 21, 2023 4:03 PM

Solapur News: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर व विधानसभा अध्यक्ष मंगेश पांढरे यांच्यासह  कार्यकर्त्यांनी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची कार्यालयातून खुर्चीच उचलून आणून मोहोळ तहसील कार्यालयाबाहेरील पाण्याच्या खड्ड्यात ठेवून आंदोलन चालू केले आहे.

सोलापूर - मोहोळ तहसील कार्यालयाच्या एका गेटला वैतागलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नागेश बिराजदार या युवकाने चक्क पाण्यात बसून वृक्षारोपण करून घाण पाण्याने आंघोळ करीत आंदोलन सुरू केले असतानाच , दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर व विधानसभा अध्यक्ष मंगेश पांढरे यांच्यासह  कार्यकर्त्यांनी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची कार्यालयातून खुर्चीच उचलून आणून मोहोळ तहसील कार्यालयाबाहेरील पाण्याच्या खड्ड्यात ठेवून आंदोलन चालू केले आहे.

मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारातील आजचा दिवस हा जणू आंदोलनानेच गाजला. तहसीलकार्यालयाच्या परिसरामध्ये तालुक्यातील शेकडो गावचे लोक ये-जा  करतात. या आवारामध्ये अनेक महत्त्वाची कार्यालय आहेत, परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे तहसील कचेरीच्या आवारामध्ये अक्षरशः पाण्याचे तळे साचले आहे. तहसीलदार कार्यालय, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, सेतु कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय  आदी कार्यालय याच परिसरात आहेत. मात्र या कार्यालयास येण्यासाठी नागरिकांना गुडघाभर पाण्यातून यावे लागते. एवढेच नव्हे तर अधिकारी, कर्मचारीही रोज या पाण्यातून येतात, परंतु एकाही अधिकाऱ्याला या आवारामध्ये मुरूम टाकण्याची मानसिकता दिसून आली नाही. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला असे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूर