आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि २५ : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली़ महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यात प्रामुख्याने मुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगांव येथील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण यांच्यासह सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीपकुमार बब्रुवान सवाने यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे़ ज्ञानेश्वर चव्हाण हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगांव येथील रहिवासी आहेत. चव्हाण हे १९९३ च्या उपविभागीय पोलीस अधिकारी बॅचचे अधिकारी आहेत़ त्यानंतर २००१ साली प्रोमोशनवरून ते आयपीएस पदावर पदोन्नतीने पदभार घेतला़ त्यांनी सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दलात चांगल्यारितीने आपली सेवा बजावली़ त्यांना सहा भाऊ आणि एक बहीण आहे. आईवडील अशिक्षित असतानाही त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. या पदकाबाबत आनंद झाला असून, अधिक चांगले काम करण्यासाठी यामुळे प्रेरणा मिळत असल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले व मुळचे पाटकूल (ता़ मोहोळ) येथील रहिवाशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीपकुमार सवाणे यांनाही पोलीस दलात मानाचे पोलीस पदक जाहीर झाले आहे़ ३ जुलै १९८३ साली पोलीस दलात रूजू झालेले सवाणे यांनी आजपर्यंत विविध पदावर काम केले आहे़ त्यांनी आजपर्यंत जेलरोड पोलीस ठाणे, अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हे शाखा, विशेष शाखा, सोलापूर ग्रामीण आदी ठिकाणी व विविध पदावर आपली सेवा चोख बजावली़ सवाने यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत़ त्यांना सुनिल नावाचा एक भाऊ आहे़ मागील ३५ वर्षापासून पोलीस दलात चव्हाण हे कार्यरत आहेत़ त्यांना आजपर्यंत ३६८ रिवार्ड मिळालेले आहेत़ आजपर्यंत बजावलेल्या सेवेबद्दल सवाणे यांनी आनंद व्यक्त करून पोलीस दलाचे आभार मानले़ या यशाबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोर्णिमा चौगुले, अपर्णा गीते, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांनी अभिनंदन केले आहे़
सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, सहा़ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार सवाणे यांना पोलीस पदक जाहीर, सोलापूर दलातील पोलीसांची मान उंचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 2:45 PM
राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली़ महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत
ठळक मुद्देसोलापूर पोलीसांची मान उंचावलीअधिक चांगले काम करण्यासाठी मिळाली प्रेरणा : ज्ञानेश्वर चव्हाणआजपर्यंत बजाविलेल्या प्रामाणिक सेवेचा गौरव : दिलीप सवाणे