शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Solapur Politics; परिचारक, संजयमामा, राऊत, जानकर एकत्र; भाजपचा उमेदवार ठरल्यानंतर घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 4:38 PM

पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर विचारमंथन ...

ठळक मुद्देपंढरपुरात गुप्त बैठक, माढा लोकसभेबाबत चर्चा झाल्यानंतर गोरेंच्या भेटीला रवानासमविचारी महाआघाडीतील नेत्यांनी पंढरपूरच्या अर्बन बँकेत बैठक घेतली आणि खलबते केली.

पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर विचारमंथन करण्यासाठी जिल्ह्यातील समविचारी महाआघाडीतील नेत्यांनी पंढरपूरच्या अर्बन बँकेत शनिवारी रात्री बैठक घेतली आणि खलबते केली.

भाजपा सत्तेत आल्यापासून भाजपा नेत्यांच्या संपर्कात असलेले झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, भाजपाकडून विधान परिषदेवर गेलेले प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत, विजयराज डोंगरे, उत्तमराव जानकर, माजी आ. शहाजीबापू पाटील यांची पंढरपूर अर्बन बँकेत गुप्त बैठकीतून खलबते झाली. 

माढा लोकसभेचे संभाव्य उमेदवार खा़ शरद पवार यांची झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली़ त्यानंतर त्यांनी माढ्यात स्वत: शरद पवार यांचे स्वागतही केले़ त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा असताना शनिवारी रात्री भाजपा नेत्यांची पंढरपूरमध्ये भेट घेऊन चर्चा केली.

संजय शिंदे यांच्या सहकार्यामुळे प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले तर आ़ प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने संख्याबळ कमी असतानाही संजय शिंदे हे झेडपी अध्यक्ष झाले़ राजकीय पटलावर एकमेकांना सहकार्य करून सत्ताधाºयांना जवळ केले़ आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा सत्तेचे गणित कशा पद्धतीने सोडवायचे याबाबत नक्कीच चर्चा झाली असणाऱ शिवसेना आणि भाजपा यांची युती झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे़ तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने ही जागा काँग्रेसकडे आहे़ त्यामुळे परिचारक यांना विधानसभा निवडणुकीपासून दूर रहावे लागेल़ त्यावर काय उपाय करता येईल, याबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

माढ्यामधून शरद पवार यांच्या उमेदवारीचे रश्मी बागल व त्यांच्या समर्थकांनी स्वागत क रून शुक्रवारी कार्यकर्ते, पदाधिकारी संवाद मेळावा घेतला. त्यास पवार यांनी हजेरी लावली. बागल गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. बागल यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनही झाले, पण बागल गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यापासून झेड. पी. अध्यक्ष संजय शिंदे व मोहिते-पाटील गटाचे समर्थक चार हात दूरच राहिले. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणाºया स्व. नामदेवराव जगताप यांच्या तिसºया पिढीचे नेतृत्व करणारे करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे पुणे येथे दोन सप्ताहांपूर्वी भेटावयास गेले. त्यांना पवारांनी चांगला रिस्पॉन्स दिल्याने शरद पवार करमाळ्यात शुक्रवारी आल्यानंतर वैभवराजे यांनी पवारांची कमलाभवानी मंदिरात भेट घेऊन ‘पवार माझ्या आजोबासारखे’ असे म्हणाले होते. 

करमाळ्यात पुन्हा स्वतंत्र मेळावा

  • - माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करमाळ्यात सर्वच गटातटांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बागलांच्या मेळाव्यानंतर आता झेड. पी. अध्यक्ष संजय शिंदे मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. पुढच्या आठवड्यात पुन्हा माजी केंद्रीय कृषी मंत्री करमाळ््यात येणार आहेत. 
  • - शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघाचे २००९ ते २०१४ या कालावधीत खासदार होते. यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते व पवारांचे समर्थक विजयाची गणितंसुद्धा मांडू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या हालचाली वेगात असल्या तरी स्थानिक नेतेमंडळींना विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचीच कुणकुण लागल्याचे दिसून येते.
टॅग्स :Solapurसोलापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPandharpurपंढरपूरSharad Pawarशरद पवारSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPoliticsराजकारण