शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Solapur Politics; सोलापूर महापालिकेच्या कामावर भाजपचे नगरसेवकही समाधानी नाहीत; महेश कोठे यांचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:45 AM

सोलापूर : महापालिकेच्या कामावर शिवसेनाच नव्हे तर भाजपाचे नगरसेवकही समाधानी नाहीत. पण थेट शासकीय योजनेतून शहराच्या अनेक भागात भुयारी ...

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीत शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर हे मतदारसंघ शिवसेनेकडे येतीलकोठे यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी मनपा सभेत हजेरी लावलीशासकीय योजनेतून शहराच्या अनेक भागात भुयारी गटार, विजेच्या पोलसह इतर चांगली कामे सुरू

सोलापूर : महापालिकेच्या कामावर शिवसेनाच नव्हे तर भाजपाचे नगरसेवकही समाधानी नाहीत. पण थेट शासकीय योजनेतून शहराच्या अनेक भागात भुयारी गटार, विजेच्या पोलसह इतर चांगली कामे सुरू आहेत. पुढील वर्षात यातून शहराचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी व्यक्त केला. 

कोठे यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी त्यांनी मनपा सभेत हजेरी लावली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या सोलापूर दौºयात कोठे यांना काँग्रेसमध्ये घेण्याबाबत सूतोवाच केले होते. त्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. 

यापार्श्वभूमीवर कोठे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपा-सेनेची युती झाली आहे; मात्र शिवसेनेचे नगरसेवक महापालिकेच्या कारभारावर नाराज आहेत. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत होईल का? असा प्रश्न विचारल्यावर कोठे म्हणाले, महापालिकेच्या कामावर शिवसेनाच नव्हे तर भाजपाचे नगरसेवक समाधानी नाहीत.

पहिल्यांदा असे घडले की निधीच मिळालेला नाही. दोन वर्षांनंतर लोकांसमोर जाताना काम काय केले हे सांगायचा प्रश्न प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांसमोर आहे. अविनाश ढाकणे यांनी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कठिण परिस्थितीत नगरसेवकांना निधी वाटला नसता तर शासकीय योजनांना हिस्सा देता आला नसता. नगरसेवकांना थेट निधी दिला काय किंवा अशा पद्धतीने दिला काय. शेवटी कामे होणारच आहेत.

लोकसभेसाठी भाजपासोबत बैठका होतील- मी आजपर्यंत पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. ज्यावेळी ज्या पक्षात जाईन तो पक्ष आपला मानून काम केले. कधीही पक्षाच्या विरोधात काम केलेले नाही. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पक्षाची शिस्त मला पाळावी लागेल. मी पाळली नाही तर खालचे लोकही पाळणार नाही. सेनेतील नेतेही मला सहकार्य करीत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करतोय. लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपच्या नगरसेवकांच्या बैठका होतील. 

मध्य, दक्षिणवर सेनेचा दावा *- विधानसभा निवडणुकीत शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर हे मतदारसंघ शिवसेनेकडे येतील असे वाटते, असे कोठे यांनी सांगितले. दरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तरीही सेना या जागेवर दावा सांगणार का? या प्रश्नावर कोठे म्हणाले, पूर्वीचा युतीचा पॅटर्न पाहिला तर दक्षिणची जागा सेनेकडे होती. बार्शी त्यांच्याकडे होती. जर बार्शी त्यांची मागणी तर दक्षिण आम्हाला मिळेल. आम्ही नवीन दावा करीत नाही. कारण ती जागा आमचीच आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखShiv SenaशिवसेनाSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारण