- दीपक दुपारगुडे सोलापूर : गुढी पाडव्याच्या दिवशी झेंडूच्या हाराचे तोरण घराला लावून हा आनंद द्विगुणीत केला जातो. याकरिता झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. घराला तोरण बांधण्यासाठी पाडव्याला झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक असते. शहरात गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला जिकडे तिकडे पिवळधम्म फुलांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत.
मात्र दोन- तीन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळ फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं त्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरात लागणार तोरण दुरावलं आहे. अतिवृष्टीमुळं भिजलेल्या फुलांना पुणे- मुंबई च्या बाजारात फुलांना मागणी नाही. मात्र स्थानिक बाजारात चांगल्या फुलांची मागणी वाढल्याने झेंडूंच्या फुलांचे दर वाढले असून ६० ते ८० रूपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री होत आहे. सध्या जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, पंढरपूर, तांदुळवाडी, बोरांनी, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ या ठिकाणाहून फुलांची आवक सुरु आहे. तर ज्या भागात आवक कमी तिथे दर अधिक तर जिथे आवक जास्त तिथे मात्र कवडीमोल दराने फुलांची विक्री होत आहे. अतिवृष्टीचा परिणाम झेंडूवरअतिवृष्टीमुळे पिकांचेच नाही तर फळबागा आणि झेंडूच्या झाडांचेही नुकसान झाल. एकरी ५० हजार रुपये खर्ची करुनही पदरी निराशच पडली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. यंदा मात्र, उत्पादनावर केलेला खर्चही पदरी पडला नसल्याचे विक्रत्याने सांगितले. असे आहेत दर झेंडू ६० -८०गुलाब १२०-१५०चिनी गुलाब १८०-२००शेवंती १५०-२००मोगरा २५०-३००निशिगंध १२०-१५०