- शीतलकुमार कांबळेसोलापूर - पूर्वी मीटरगेज रेल्वे रुळ असलेल्या ठिकाणी नागरिकांनी घरे बांधली. या जागेत रेल्वेने मागील 15 दिवसांपूर्वी खांबे रोवून त्यावर सीआर (सेंट्रल रेल्वे) असे लिहिले आहे. यामुळे छत्रपती संभाजी तलाव ते मजरेवाडी रेल्वे गेट परिसरात सोसायटीत राहणाऱ्या नागरिकात घबराट पसरली आहे. आपल्या घर आणि जागेला काही धोका तर नाही ना अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
रेल्वेकडून काही वर्षांपूर्वी जुन्या ठिकाणाहून (मीटर गेज) रेल्वेची सुविधा देण्यात आली होती. मागील काही वर्षांपूर्वी रेल्वेने ही सुविधा बंद केली होती. त्यानंतर त्यांनी तिथले रेल्वे रूळ काढून घेतले. यामुळे रिकाम्या जागेत अनेकांनी आपली घरे, दुकाने, मंगल कार्यालये वसवली. लाखो रुपये खर्च करुन इमारती बांधल्या.
मात्र, एक महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्याकडे असलेल्या जागेचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात त्यांनी आपली हद्द कुठपर्यंत आहे, हे कळण्यासाठी लोखंडी खांब रोवली. एवढ्यावरच न थांबता पंधरा दिवसांपूर्वी ही खांबे रोवून त्यावर सेंट्रल रेल्वे असे लिहिण्यात आले. त्यामुळे आपली राहती घरे व जागा आता रेल्वेच्या ताब्यात जाणार का ही चिंता नागरिक करत आहे.
जागा आमचीच.. कागदपत्रेही आमच्याकडे1990 मध्ये या जमीनीवर इमारती बांधण्यात आल्या होत्या. कलेक्टर एनए ऑर्डर या त्याच वर्षी झाली होती. या जमिनीचा मोजणी नकाशा आमच्याकडे आहे. महापालिका परवानगी, सातबारा, कलेक्टरची येणे ऑर्डर, मोजणीची कागदपत्रे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन या परिसरातील जागेचे पूर्वीचे मालकांनी सांगितले.