सोलापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए कॅबिन दरम्यान नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता गाड्या रद्द, मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक २७ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे. याच काळात सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, ट्रॉफिक ब्लॉकमुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. पनवेल-नांदेड एक्सप्रेस दिनांक २९ जुलै ते ३१ जुलै २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेस २९, ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.
सिकंदराबाद-पुणे एक्सप्रेस २९ ते ३१ जुलै, पुणे-सोलापूर एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट, सोलापूर-पुणे एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट, पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे एक्सप्रेस, सोलापूर-दौंड मेमू, पुणे-हरंगुळ, हरंगुळ - पुणे, सोलापूर-पुणे डेमू, पुणे-सोलापूर डेमू रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय अमरावती-पुणे एक्सप्रेस २९ जुलै, सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३० जुलै, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्सप्रेस ३१ जुलै, पुणे-अमरावती, अमरावती-पुणे एक्सप्रेस १ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.