- रूपेश हेळवेसोलापूर - आईला मारहाण करताना मध्यस्थी करताना शिक्षिकेला मारहाण करत तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत शिक्षिकेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या शिक्षिका असून त्या आपल्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी आराेपी आंबादास जाधव, हरी जाधव यांनी घरात घूसून त्यांच्या सोबतचे अर्जुन सलगर, सुजीत कोकरे, अनिकेत सुळ, नामदेव पाटील, नागेश पडवळकर (रा. सर्व सोलापूर) यांना फिर्यादीच्या आईच्या घरात घसुन ते घर रिकामे करण्यास सांगितले. यामुळे सर्व आरोपी हे फिर्यादीच्या आईला मारहाण करत घर खाली करत होते. तेव्हा मध्यस्थी करत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादींनाही मारहाण केली. शिवाय त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांच्याशी मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून वरील सर्व आरोंपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.