- शीतलकुमार कांबळे
सोलापूर : आयपीएलचा सीजन संपून काहीच दिवस झाले असताना आता वेध लागले आहेत एमपीएलचे (महाराष्ट्र प्रीमियर लीग). या लीगमध्ये महाराष्ट्रातील सहा संघाची नावे जाहीर झाली आहेत. सोलापूर रॉयल्स या नावाने सोलापूरचा संघ एमपीएलचे मैदान गाजवणार आहे.
एमपीएलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड झाली. मात्र त्यातील फक्त एकच खेळाडू प्रवीण दशेट्टी हा सोलापूर रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. शुभम कोठारी (पुणेरी बाप्पा), अर्शिन कुलकर्णी (इगल नाशिक टाययन्स), निखिल मादास (कोल्हापूर टस्कर्स), अशी सोलापूरच्या खेळाडूंची नावे असून ते वेगवेगळ्या संघाकडून खेळणार आहेत.
एमपीएलमध्ये एकूण सहा संघ आहेत. हे संघ एकमेकांशी भिडणार असून डीडी स्पोर्ट या चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि डी डी स्पोर्ट्स यांच्यात करारदेखील झाला आहे. एमपीएल १५ जून ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानात खेळविली जाणार आहे.
सोलापूर रॉयल्सचा संघविकी ओत्सवाल, सत्यजीत बच्छाव, ओंकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, प्रवीण दशेट्टी, अथर्व काळे, यश नहार, मेहूल पटेल, यासर शेख, देव नाटू, अभिनव भट्ट, स्वप्नील फुलपगार, विशांत मोरे, रिषभ राठोड आणि संकेत फराटे.