सोलापूर : सोलापूर मंडलातील विना तिकीट प्रवासी, अनाधिकृत विक्रेते, प्रवाशांना त्रास देणारे तृतीयपंथी, रेल्वेत प्रवास करताना धुम्रपान करणारे प्रवासी व महिलाच्या आरक्षित डब्यात प्रवेश करणारे पुरूष प्रवास अशा विविध कारणांने गैरकृत्य करणाºया सोलापूर मंडलातील ९१६ जणांवर सोलापूर मंडलातील आरपीएफ पोलीसांच्या पथकाने कारवाई केली. नोव्हेंबर महिन्यातील या कारवाईतून ४ लाख ३८ हजार ४१२ रूपयांचा दंड केला असल्याची माहिती सोलापूर मंडलातील आरपीएफ पोलीसांचे विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी दिली.
प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी सदैव तत्पर असलेल्या आरपीएफ पोलीसांनी नोव्हेंबर महिन्यात सोलापूर मंडलातून जाणाºया रेल्वेमधील प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याचे काम केले़ या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी रेल्वेत प्रवाशांना त्रास होईल असे कृत्य करणाºयांवर कारवाई केली़ नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक कारवाई ही विनातिकीट करणाºया प्रवाशांवर करण्यात आली़ सुरक्षा पुरविण्याबरोबरच विना तिकीट प्रवास करणाºयांवरही आरपीएफ पोलीसांनी कारवाई केली़ यात ६०७ प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून आले.
अशी आहे नोव्हेंबर महिन्यातील कारवाई
- - अनाधिकृत विक्रेते - १६३ जणांकडून १ लाख ६२ हजार ५९५ रूपयाचा केला दंड
- - प्रवाशांना त्रास देणारे तृतीयपंथी - ५४ जणांवर कारवाई करून ४२ हजार ४०० रूपयाचा केला दंड
- - रेल्वेत तंबाखू, सिगारेट ओढणारे प्रवासी : ७२ जणांवर कारवाई करून १५ हजार ४०० रूपयाचा केला दंड
- - विनातिकीट रेल्वेने प्रवास करणारे : ६०७ जणांकडून २ लाख १६ हजार १७ रूपयाचा वसुल केला दंड
११ जणांना दाखविला जेलचा रस्तागैरकृत्य करून दंड न भरणाºया ११ प्रवाशांना आरपीएफ पोलीसांनी जेलमध्ये टाकले आहे़ यात ७ अनाधिकृत विक्रेते, प्रवाशांना त्रास देऊन जबरदस्तीने पैशांची मागणी करणारे ३ तृतीयपंथी आणि रेल्वेत विनापरवानगी तंबाखू, सिगारेट, दारू पिणारे ८ जणांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आरपीएफ पोलीसांचे पथक रेल्वे गाड्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहे़ प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाते़ वारंवार पडणारे दरोडे, चोºयांचे प्रमाण कमी करण्यात आरपीएफ पोलीसांना यश आले आहे़ गैरकृत्य करणाºयांवर आता कारवाई सुरू केली असून ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे़जयण्णा कृपाकर,विभागीय सुरक्षा आयुक्त,आरपीएफ पोलीस, सोलापूर रेल्वे मंडल