शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

सोलापूरात स्कूलबसवरील कारवाईचा धडाका सुरूच!

By admin | Published: June 24, 2017 12:33 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : आरटीओ व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग तिसऱ्या दिवशी केलेल्या स्कूलबस तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या. अक्कलकोट येथे ७, बार्शीत ५ तर सोलापुरात १६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या धोकादायक वाहतुकीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी घेतली. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सोलापूर शहर, अक्कलकोट आणि बार्शीत राबविलेल्या स्कूलबस तपासणीत २८ वाहने जप्त करण्यात आली. यात क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त विद्यार्थी वाहतूक, फिटनेस प्रमाणपत्र, स्पीड गर्व्हनर, विद्यार्थी वाहतूक परवाना नसलेली वाहने जादा आढळली. यात पालकांकडून फी घेऊन चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी शाळांची ही वाहने आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत शालेय विद्यार्थी सुरक्षा वाहतूक समितीची स्थापना झालेली असताना ही स्थिती आहे. शालेय सुरक्षा समितीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असताना त्यांनी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात मोटार वाहन निरीक्षक नंदकुमार काळे, संजय उदावंत, अनुपमा पुजारी, मारुती हजारे, विजय लोखंडे, सौरभ सोयगावकर यांच्या पथकाने विविध भागातील शाळांसमोर अचानकपणे जाऊन वाहनांची तपासणी केली. यात रिक्षा, मॅजीक, मारुती व्हॅन आणि बसमधून क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणारी १६ वाहने जप्त करण्यात आली. सेंट थॉमस स्कूलच्या बसची क्षमता २८ असताना ८७ विद्यार्थी आढळले. आरटीओच्या पथकाने ही बस जप्त केली. आसन व्यवस्थेत बदल करून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. ----------------------अक्कलकोटमध्ये गॅसबॉम्बवर विद्यार्थीअक्कलकोट शहरात सहायक मोटार वाहन निरीक्षक शफी उचगावकर, संतोष डुकरे, अभय साळुंके, शीतल कुंभार यांच्या दोन पथकाने अचानकपणे तपासणी केली. एमएच १३/बीएन ६१७0 या क्रमांकाच्या क्रुझर जीपमध्ये २४ विद्यार्थी आढळले. ही बस लायन्स जीप स्कूलकडे निघाली होती. बसस्थानकाजवळील तपासणीत या जीपवर कारवाई करण्यात आली. लीड स्कूलकडे निघालेली एमएच ३१/ सीएन ६७९४ या क्रमांकाची मारुती ओमनी कार पकडण्यात आली. कारमध्ये सात मुले होती पण सीटखाली घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर आडवे ठेवले होते. एलपीजी सिलिंडर चालू स्थितीत आडवे ठेवणे धोकादायक असते. अशा घरगुती गॅस सिलिंडरवर ही कार चालविण्यात येत होती. ---------------------बार्शीतील रिक्षात होती १७ मुलेबार्शी येथे श्रीनिवास मूर्ती, कळमणकर यांच्या पथकाने स्कूलबस तपासणी मोहीम राबविली. आरटीओच्या पथकाला पाहून एमएच १३/ जी ७७६५ या रिक्षाचा चालक विद्यार्थी तसेच सोडून पळून गेला. या रिक्षात १७ विद्यार्थी होते. पथकाने हे विद्यार्थी शाळेला पोहोच करून रिक्षा ताब्यात घेतली. बार्शी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कऱ्हाड गुरुकुलकडे जाणारी एमएच १३ बी/ ५१४२ या क्रमांकाची बस पकडण्यात आली. बसमध्ये ६२ विद्यार्थी होते. बसचे फिटनेस प्रमाणपत्र व स्पीड गर्व्हनर नसल्याचे आढळले. ही बस जप्त करण्यात आली. ८ वाहनांच्या तपासणीत ५ वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळले. यात एक स्क्रॅप रिक्षातून ९ तर मारुती व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती.-------------------------सोलापुरातील पोलिसांचीच वाहने जप्तसोलापूर : शहर वाहतूक पोलीस व परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी अचानकपणे पोलीस आयुक्तालयातील दुचाकीवरून विनाहेल्मेट, वाहन परवाना व पीयुसी नसताना कामावर येणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांना पकडले. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे व पोलीस निरीक्षक काणे व आरटीओ यांच्या पथकाने पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबून वाहन तपासणी सुरू केली. पोलीस आयुक्तालयात दुचाकीवरून विनाहेल्मेट, वाहन परवाना नसणे, पीयुसी नसणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने अडविण्यात आली.