- विलास जळकोटकरसोलापूर - शाळेत राष्ट्रीत सुरु असताना एक शाळकरी मुलगा अचानक चक्कर आल्यानं खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आश्रमशाळा माढा येथे ही घटना घडली. रणजित भीमराव तोंडे (वय- १६, रा. माढा आश्रमशाळा) असे या मुलाचे नाव आहे. यातील जखमी मुलगा हा माढा आश्रमशाळेत शिक्षणासाठी आहे. आश्रमशाळेच्या वसतिगृहात अन्य मुलांप्रमाणेच वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी तो सर्व मलांसमवेत राष्ट्र्गीतासाठी उभे होता. अचानकल त्याला चक्कर आल्याने पडला. तातडीने शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला माढ्यातील सरकारी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर येथे हलवले. येथे त्याचे सिटीस्कॅन करण्यात आले. त्याच्यावर उपचारानंतर बुधवारी घरी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सदरील मुलगा हा परभणी जिल्ह्यातील केदार वस्ती पाथरी येथील असल्याचे समजले. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातील विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेतात. वसतिगृहात राहत असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.