- विलास जळकोटकर सोलापूर - सर्व्हिस इन्चार्ज म्हणून एका दुकानात काम करणाऱ्या कामगारांनं काम करता करता त्यातून ग्राहकांकडून मिळालेल्या तब्बल ५ लाख ५८ हजार ६५० रुपयांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. अशा आशयाची फिर्याद राजेंद्र मलकप्पा बिराजदार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार २ जून २०२२ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधी घडला. या प्रकरणी अक्षय दत्तात्रय सूर्यवंशी (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
यातील फिर्यादी राजेंद्र बिराजदार (वय ५६, रा. सूयोग सृष्टी अपार्टमेंट, रविवार पेठ, सोलापूर) हे सिद्धेश्वर पंचकट्टा येथील सूयोग डिजीटल प्रा. लि. फर्ममध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. येथे सर्व्हिस इन्चार्ज म्हणून अक्षय दत्तात्रय सूर्यवंशी हे काम करतात. त्यांनी २ जून २०२२ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत दुकानातून गिऱ्हाईकांनी दिलेले सर्व्हिसचे चार्ज, स्पेअर पार्ट विक्रीमधून मिळालेली रक्कम ५ लाख ६५० ही स्वत:साठी वापरुन सुयोग डिजीटल प्रा. लि. सोलापूर या फर्मच्या दुकानाच्या बिल पावत्याच्या माध्यमातून आलेली रक्कमेची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक हवालदार भालशंकर करीत आहेत.