राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत सोलापुरात शिवसेनेच्यावतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरात शिवसेनेच्यावतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून निषेध करण्यात आला. राज्यपालांनी आजच रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसंच दररोज राज्यपालांच्या कार्यालयात फेऱ्या मारणारे भाजप नेते माफी मागणार काय असा सवालही यावेळी करण्यात आला.
सुप्रिया सुळेंचीही प्रतिक्रियासुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या एका निकालाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार, तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.