शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

चार राज्यांना सेवा देणारं सोलापूर व्हायला हवं मेडिकल हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:06 PM

Doctor's Day : नऊ हजार बेड्सच्या ३५० हॉस्पिटल्समधून यशस्वी उपचार

ठळक मुद्दे ‘डब्ल्यूएचओ’च्या नियमानुसार हवा ४०० लोकांमागे एक डॉक्टर शहरात सतराशे जणांमागे केवळ १ डॉक्टरसोलापूरची भौगोलिकता व तुलनेने मिळणारे स्वस्त उपचार यामुळे येथे येणाºया रुग्णात वाढ होत आहे

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : महानगरांच्या तुलनेत किफायतशीर आणि आपुलकीची, अजोड वैद्यकीय सेवा मिळत असल्यामुळे अलीकडे महाराष्टÑाच्या विविध शहरांसह शेजारील कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील रुग्ण सोलापुरात उपचारासाठी येत असून, हे शहर आता मेडिकल हब म्हणून जाहीर व्हावं, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या शहरात ३५० रुग्णालयांतून नऊ हजार बेड्सच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार मात्र शहरात डॉक्टरांची संख्या कमी आहे. सध्या १७०० नागरिकांमागे एक डॉक्टर असून, हे प्रमाण ४०० रुग्णांमागे एक डॉक्टर   असायला हवे, असेही सांगण्यात आले. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सोलापुरातील मेडिकल टूरिझम या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार सोलापुरात उपचार घेणाºया रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील आहेत. सोलापुरात स्वस्त व चांगले उपचार मिळत आहेत. येत्या पाच वर्षांत पुणे येथील रुग्ण सोलापुरात येण्याच्या संख्येत वाढ होईल, आता याची सुरुवात झाल्याचे डॉ. मेतन यांनी सांगितले.

वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने नियमानुसार प्रत्येक ४०० लोकांच्या मागे एक डॉक्टर असणे अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार ७०० लोकांच्या मागे एक डॉक्टर आहे. आयुर्वेद, होमिओपॅथिक व युनानी डॉक्टरांची एकूण संख्या पाहता ७०० नागरिकांच्या मागे एक डॉक्टर आहे. 

फॅमिली डॉक्टरांच्या संख्येत घट- एमबीबीएस झाल्यानंतर जनरल प्रॅक्टीस करण्यापेक्षा स्पेशलायझेशन करण्याकडे डॉक्टरांचा कल आहे. यामुळे फॅमिली डॉक्टर्सची संख्या कमी होत आहे. शहरात प्राथमिक सेवा देणाºया एमबीबीएस डॉक्टरांची संख्या सुमारे ३० ते ४० आहे. ग्रामीण भागात सेवा देणाºयांमध्ये एमबीबीएसपेक्षा बीएएमएस डॉक्टरांची संख्या जास्त आहे.

सोलापूरची भौगोलिकता व तुलनेने मिळणारे स्वस्त उपचार यामुळे येथे येणाºया रुग्णात वाढ होत आहे. मेट्रो शहराच्या तुलनेत सोलापुरात ४० टक्क्यांनी स्वस्तात उपचार होतात. सोलापुरातील डॉक्टर हे रुग्णाशी चांगला संवाद साधतात, हे देखील याचे एक महत्त्वाचे कारण आहे, तर मेट्रो शहरामध्ये डॉक्टर फक्त एकदाच रुग्णाला भेटतात. - डॉ. व्यंकटेश मेतन माजी अध्यक्ष, आयएमए

रुग्णसेवा करणे हे डॉक्टरांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. सध्या रक्तदानाविषयी जागृती पसरवणे, तंबाखूपासून नागरिकांना परावृत्त करणे व वाढत्या लठ्ठपणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे.  - डॉ. पुष्पा अग्रवाल अध्यक्ष, आयएमए

ग्रामीण भागात सेवा देण्यामध्ये तसेच सर्वच ठिकाणी प्राथमिक सेवा देण्यामध्ये बीएएमएस, होमिओपॅथिक व युनानी डॉक्टर आघाडीवर आहेत. साध्या आजारासाठी कन्सल्टंटकडे जाणे सामान्य रुग्णांना परवडणारे नसते. जनरल प्रॅक्टीस करणारे डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावतात. - डॉ. विनायक टेंभुर्णीकर केंद्रीय अध्यक्ष निमा

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल