यशवंत सादूलसोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वरांची गड्डा यात्रा आता उंबरठ्यावर असून, नंदीध्वज पेलणाºया सेवेकºयांच्या घरांमध्ये पूजाविधीच्या कार्यक्रमांचीही रेलचेल आहे. एका नंदीध्वजाची दिवसात तीन घरांमध्ये पूजा होत असून, सकाळ आणि संध्याकाळच्या पूजनानंतर मात्र प्रसाद म्हणून हमखास हुग्गीचा बेत ठेवला जात आहे. नंदीध्वज पेलणाºया सेवेकºयांसाठी हुग्गीचा प्रसाद शक्तिवर्धक आणि पौष्टिक असल्याने हुग्गीच्या प्रसादाची परंपरा कायम असल्याचे मानकºयांचे म्हणणे आहे.
हुग्गीसाठी लागणाºया जोड गव्हाची मागणीही वाढली सध्या वाढली असून,खास हुग्गी बनविणाºया आचाºयांनाही दिवसात दोन - तीन निमंत्रणे मिळत आहेत.
हुग्गीसोबत वांग्याची भाजी, सांडगे, कडली ब्याळी (हरभरा), चटणी, चपाती, वरण, भात, कटाची आमटी (आंबूर), तळलेली मिरची, भजी, कुरडई, पापड, लोणचे हे पदार्थ हुग्गीची चव वाढविण्यासाठी असतात. शिजण्यास उपयुक्त, मऊ व सकस प्रथिनेयुक्त असल्याने हुग्गीसाठी जोडगहू वापरण्यात येते़५० ते ६० रूपये किलो दर असून, यात्रेनिमित्त मोठी मागणी असून, वर्षभरही विक्री होते,खास पंजाबहून मागविले जाते, असे व्यापारी केदार दामा यांनी सांगितले.
अशी बनविली जाते हुग्गी- हंड्यात पाणी ओतून उकळू लागल्यावर त्यात गहू शिजवण्यासाठी टाकले जाते़दोन ते तीन तास शिजल्यावर त्यामध्ये गूळ टाकून चाटूने गोटत राहण्याची प्रक्रिया अडीच ते तीन तास करण्यात येतेग़हू व गूळ एकजीव झाल्यावर त्यामध्ये हुग्गीचा मसाला टाकण्यात येतो़यामध्ये खोबरे,जायफळ,विलायची,खसखस ,सुंठ,बडीशेप,काजू,बदाम,असते़ त्यानंतर तास -दीड तास घोटण्याची क्रिया झाल्यानंतर हंड्यावर झाकण ठेवून मंद आºयावर ठेवण्यात येते़ त्यामुळे गरमागरम हुग्गीचा आस्वाद घेता येतो़ घरगुती हुग्गी बनविण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असून गहू भिजवूनसुद्धा केली जाते़
आरोग्यासाठी उत्तम - व्यंकटेश मेतन - जोडगहू , गूळ व तूप वापरून तयार केलेल्या हुग्गीमध्ये उच्च प्रतीचे प्रथिने असतात़सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना वाढलेल्या थंडीच्या दिवसात अंगात ऊब राहावी यासाठी हुग्गी अंत्यत उपयुक्त आहे.दुधासोबत सेवन केल्यास कॅल्शियमही मिळते,तुपामुळे फॅट वाढतो.
साहित्य प्रमाण- एक किलो हुग्गी बनविण्यासाठी एक किलो जोड गहू,दोन किलो गूळ, मसाला- काजू,बदाम,खसखस प्रत्येकी ५० ग्रॅम, विलायची सुंठ,बडीशेप,प्रत्येकी १५ ते २० ग्रॅम,खोबरे २५० ग्रॅम,तूप वापरण्यात येते़
हुग्गी बनविण्यात महिला अग्रेसर - सोलापुरात हुग्गी बनविणारे ४० ते ५० आचारी असून, त्यात ९० टक्के महिला आहेत़ शुभदा वाले,सुनंदा कुदळे,गंगाबाई आवने, आवम्मा मठपती,शारदा पडगानूर,लक्ष्मीबाई वाले,सुजाता तिपरादी, गौरम्मा आवटे, गौराबाई झळके,मेणसे आजी,विजापुरे मावशी हे अग्रक्रमाने आहेत़ ४०० ते ५०० जणांना हुग्गी बनविण्यासाठी तीन ते चार हजार रुपये मानधन दिले जाते़ त्यासाठी चार ते पाच महिलांच्या मदत लागते.