शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; नंदीध्वज सरावासाठी सरसावले भावी अभियंते; सराव करताना बंद ठेवतात तीन तास मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:27 PM

भक्ती अन् शक्तीचा संगम : मुलांमधील बदल माता-पित्यांना आनंद देणारा

ठळक मुद्देनंदीध्वज पेलण्याच्या सरावात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या भक्तीनेच या मुलांमधील शक्तीचे दर्शन नंदीध्वज सराव म्हणजे व्यायाम अन् योगाचे काही प्रकारही या तरुणाईकडून घडताना आनंद

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : मोबाईलच्या जमान्यात पार रमून गेलेल्या तरुणाईला कसले कष्ट अन् कसला आलाय व्यायाम. मोबाईल एके मोबाईल, यालाच विश्व मानलेल्या भावी अभियंत्यांचे पाऊल नंदीध्वज सरावाकडे वळताना भक्ती अन् शक्तीचा संगमही पाहावयास मिळतो. सरावावेळी काही भावी अभियंते आपला मोबाईल तीन तास स्विचआॅफ, तर काही जण सायलेंटवर ठेवतात. सध्या नंदीध्वज सरावावेळी हे चित्र नेत्रांमध्ये टिपताना त्यांच्यात व्यायामाची गोडी लागत असल्याचे प्रखरपणे दिसले. 

दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसºया सप्ताहात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते. तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन सोहळा आणि शोभेचे दारूकाम या चार प्रमुख सोहळ्यादिवशी निघणाºया मिरवणुकीत नंदीध्वज पेलण्याच्या सरावाला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. त्यानंतर नोव्हेंबर महिना उलटला तर पुढे जानेवारी अखेरपर्यंत भरणाºया गड्डा यात्रेपर्यंत ‘आला थंडीचा महिना...’ या मराठी गाण्याचे स्मरण होते. थंडी अन् व्यायाम हे समीकरणही डिसेंबर ते जानेवारी आणि पुढे फेब्रुवारीपर्यंत पाहावयास मिळते. 

नंदीध्वज पेलण्याचा सराव म्हणजे एक उत्तम व्यायामही आहे. एका शिस्तीत नंदीध्वज पेलत पुढे सरकणं म्हणजे योगाचे काही प्रकारही पाहावयास मिळतात. आजच्या तरुणाईवर बाबा रामदेवांचा खूप मोठा प्रभाव आहे. 

कुठे तरी तो प्रभाव आजच्या तरुणाईला नंदीध्वज सरावाकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. शहरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाºया मुलांना सक्ती नाही ना बंधन. ही मुले स्वत:हून महिना, दीड महिना आपल्या हातातील मोबाईलला थोडं बाजूला सारून सरावावेळी दत्त म्हणून हजर असतात. आपल्या मुलांमधील हा चांगला बदल पाहताना कुठल्या माता-पित्यांना आनंद होणार नाही. मुलांची शारीरिक वाढ होणारे हेच वय असते. नेमक्या याच वयात व्यायामाची जोड मिळाली पाहिजे आणि ती जोड शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सध्या सुरू असलेल्या नंदीध्वज सरावाने मिळवून दिली आहे. 

आसिम सिंदगी, अप्पू शिरशी, प्रतीक थोबडे, अमित गुंगे, श्रीधर माळी, केदारनाथ म्हेत्रे, महांतेश गोरे, सतीश माळी, मल्लिनाथ म्हेत्रे ही तरुणाई सध्या हातातील खेळणं बनलेल्या मोबाईलला दूर सारत सरावात सहभागी होत आहेत. 

ज्या-त्या मास्तरकडून घेतात धडे !- श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या सातही नंदीध्वजांचे मास्तर ठरलेले असतात. नंदीध्वजधारकांना नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव करून घेण्याची खूप मोठी जबाबदारी या मास्तर मंडळींवर असते. सध्या नंदीध्वज पेलण्याच्या सरावाला आता कुठे प्रारंभ झाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण अन् अभ्यासातून वेळ काढून विद्यार्थी स्वत:हून आता सरावाला वेळ देताना त्यांच्यातील एक चांगला बदल पाहावयास मिळतो.

नंदीध्वज पेलण्याच्या सरावात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी दिसत आहेत, ही चांगलीच बाब आहे. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या भक्तीनेच या मुलांमधील शक्तीचे दर्शन घडते. नंदीध्वज सराव म्हणजे व्यायाम अन् योगाचे काही प्रकारही या तरुणाईकडून घडताना आनंद वाटतो.-राजशेखर हिरेहब्बूमानकरी, श्री सिद्धरामेश्वर यात्रा.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय