आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी़़़एकदा हर्र बोलाचा जयघोष़़़आसरा चौकातून निघालेल्या सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची जुळे सोलापूरपर्यंत मिरवणूक काढली़ त्यानंतर नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले.मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या नेतृत्वाखाली सराव काठ्यांची मिरवणूक निघाली़ जुळे सोलापूरमधील गोकुळ नगरवासीय, विरांगणा महिला मंडळ यांच्या वतीने हा आध्यात्मिक उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला़ या मिरवणुकीत हजारो भक्तगणांनी सहभाग नोंदवत सिद्धरामेश्वरांचा जयघोष केला़ आसरा चौकातून सिद्धरामांचा जयघोष करीत काठ्यांची मिरवणूक आसरा पुलावरुन डी मार्ट चौकातून पाण्याच्या टाकीजवळ आणली गेली़ एका रांगेत डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी आणि सिद्धरामेश्वरांच्या जयघोषाने जुळे सोलापूर मार्ग दुमदुमून गेला़ यावेळी टाकीच्या बाजूला मोकळ्या मैदानात या काठ्यांचे आगमन झाले़ येथे प्रशांत तडकल, किरण मळेवाडी, गुणवंत चव्हाण, प्रशांत शाबादी आणि मल्लिकार्जुन बागेवाडी या दापत्यांच्या वतीने पाचही नंदीध्वजांची पूजा करण्यात आली़ जुळे सोलापुरात या नंदीध्वज मिरवणुकीने वातावरण भक्तिमय करून सोडले़ या नंदीपूजन सोहळ्यानंतर भक्तगणांना महाप्रसाद वाटप करण्यात आला़ -----------------नंदीध्वजांचे स्वागत...-सिद्धरामेश्वरांच्या जयघोषात निघालेल्या नंदीध्वजांचे अनेक भक्तगणांनी स्वागत केले़ नगरसेविका मनिषा हुच्चे आणि त्यांच्या परिवाराने आसरा पुलाजवळ नंदीध्वजाला हार अर्पण करीत पूजा केली़ त्यानंतर काठ्या पुलावरुन मार्गस्थ झाल्या़ यावेळी रस्त्यावर एका बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती़ तसेच पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता़ चौका-चौकात गोकुळनगरच्या युवकांनी वाहतुकीला मार्ग काढून देत रहदारी ठप्प होऊ दिली नाही़ आसरा चौकात केला जयघोष़़़- मानाचे पाचही नंदीध्वज (सराव काठ्या) आसरा चौकात आणल्यानंतर यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते सराव काठ्यांची पूजा करण्यात आली़ यावेळी फटाके फोडून एकदा भक्तलिंग हर्र बोला़़़चा जयघोष करत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली़ अॅड़ मिलिंद थोबडे, नगरसेवक किरण देशमुख, भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेवक राजेश काळे, नगरसेविका संगीता जाधव, राजश्री चव्हाण, विश्वनाथ शेगावकर, वेदमूर्ती बसवराजशास्त्री हिरेमठ, आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक आऱ वाय़ पाटील, जितेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती़
सोलापूर सिध्देश्वर यात्रा : नंदीध्वजांचे जुळे सोलापूरात पूजन, गोकुळनगरवासीय, विरांगणा महिला मंडळाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:52 PM
डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी़़़एकदा हर्र बोलाचा जयघोष़़़आसरा चौकातून निघालेल्या सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजांची जुळे सोलापूरपर्यंत मिरवणूक काढली़ त्यानंतर नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले.
ठळक मुद्देजुळे सोलापूरमधील गोकुळ नगरवासीय, विरांगणा महिला मंडळ यांच्या वतीने हा आध्यात्मिक उपक्रमएका रांगेत डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या सुवासिनी आणि सिद्धरामेश्वरांच्या जयघोषाने जुळे सोलापूर मार्ग दुमदुमून गेला़ जुळे सोलापुरात या नंदीध्वज मिरवणुकीने वातावरण भक्तिमय करून सोडले़