- दीपक दुपारगुडे सोलापूर - याअगोदर रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी इतर राज्यांत जावे लागायचे. मात्र, कोष विक्रीसाठी बाजारपेठ सोलापुरात म्हणजे हिरज येथेच करण्यात आली आहे. जालन्यानंतर सोलापूर शहरालगत हिरज येथेच कोष खरेदीची बाजारपेठ यावर्षीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती आली तरी थोडेफार नुकसान पोहोचेल. मात्र, पीक उत्पादन देणार. तुमच्याकडे बऱ्यापैकी पाणी असेल तर अधिकच उत्तम. तुम्ही तुतीची अर्थात रेशीमशेती करू शकता. मात्र, मागील वर्षीचा कमी पाऊस व यंदाच्या कडक उन्हाळ्यात आहे त्या रेशीमशेतीला झळ बसण्याची शक्यता आहे.
लापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना जसे सोयाबीन पीक सोईचे वाटत आहे, तसे अलीकडे रेशीम पीक क्षेत्र वाढताना दिसत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात तुती लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. वादळ-वारे, गारपीट अथवा इतर नैसर्गिक आपत्ती आली तरी तुतीच्या पिकाचे फार असे नुकसान होत नाही. पावसाच्या पाण्यावर अवलंबून दोन-तीन उत्पादने, तर पाणी उपलब्ध असेल तर वर्षभरात पाच-सहा उत्पादने घेता येतात. जिल्ह्यात सध्या १५५ गावांत ८१९ शेतकऱ्यांकडे ९७८ एकर तुतीची लागवड आहे. साडेचारशेहून अधिक शेतकऱ्यांनी ५०० एकरांपेक्षा अधिक एकरात तुतीची लागवड करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी दिली.