- शीतलकुमार कांबळेसोलापूर : जिल्हा परिषदेत गतवर्षी दोन दिवस रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा अहवाल उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे यांनी शासनास सादर केला होता. हा अहवाल पाहून राज्य उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रानभाजी महोत्सव साजरा करण्यात यावा, असे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
रानभाज्या महोत्सवाचा सोलापूर पॅटर्न राज्यभरात लागू झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी उमेद अभियानाचे व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, मीनाक्षी मदिवळी, दयानंद सरवळे,अमोल गलांडे आणि सर्व टीमचे यानिमित्ताने अभिनंदन केले.
पाककृतीचे प्रात्यक्षिक जागेवरचमहोत्सवात रानभाज्यांची पाककृती उपलब्ध करून देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनी या रानभाज्यां महोत्सवाचा लाभ घेतला होता. त्यामुळे या महोत्सवात सहभागी बचत गटांनी हजारो रुपये नफा मिळविला. या महोत्सवात एकूण २९ स्टॉलवर २.६८ लाख रुपयांची रानभाज्यांची विक्री झाली होती. त्यातून ८२,५७७ रुपयांचा नफा झाला होता.