अधिकाऱ्यांची धावपळ; दोन दिवसात पाणी पुरवठा पंढरपूर : शहरातील औद्यगीक वसाहत व शिंदे नाईक नगर या परिसरात पिण्यसाठी पाणी मिळत नाही. अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील पाण्याची सोय केली जात नाही. यामुळे या परिसरातील महिलांनी पाण्याची भांडी घेऊन सरगम चौकात रास्तो रोको केला.सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या बंधाऱ्यात मोजकेच पाणी शिल्लक आहे. यामुळे नगरपालिका प्रशासन पंढरपूर शहरातीस सर्व भागात एकदिवसा आड पाणी पुरवठा करत आहे.
मात्र औद्यगीक वसाहत व शिंदे नाईक नगर या परिसरात मोजक्याच ठिकाणी पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. या परिसरातील पाईप लाईन खराब आहे. यामुळे पाणी येत नाही. यामुळे या परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वनवन करावे लागते. ज्या नागरीकांच्या घरात पाण्याचे कनेक्शन आहेत. तेथे ही कमी दाबाने पाणी येते. यामुळे या परिसरात पाणी मिळत नाही. याबाबत या परिसरातील नागरीक व महिला नगरपालिका प्रशासनाकडे सहा महिन्यापासून तक्रार करत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
यामुळे औद्योगीक वसाहत, दाळे गल्ली, शिंदे नाईक नगर, सरगम चौक पिछाडी भाग, नविन कुंभार गल्ली, जुनी वडार गल्ली आदी परिसरातील महिलांनी व नागरीकांना सामाजीक कार्यकर्ते किरण घागडे व संतोष धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सरगम चौक येथील रस्त्यावर भांडी ठेवून रास्ता रोको केला.यावेळी विद्या सांळुखे, राजू सांळुखे, आशा सांळुखे, छाया सांळुखे, मनिषा कुलकर्णी, शालन पवार, प्रमिला पवार, निता गायकवाड, सुनिता निकम, मंगल चव्हाण, चंद्रभागा भोसले, रेश्मा सांळुखे उपस्थित होते.या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. तरीही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मंगळवार पर्यंत या परिसरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही केली, तर पुन्हा तिव्र आंदोलन करणार आहे.- किरण घाडगेमाजी नगरसेवक