सोलापूर: मार्च महिना उजाडला की, दरवर्षी उन्हाचे चटके जाणवू लागतात. यंदाही हीच अवस्था झाली. तापमानाच्या पाºयाने चाळिशी ओलांडून सोलापूरकरांना त्राही त्राही करून सोडले आहे.
गुरुवारी येथील वेधशाळेमध्ये या वर्षातील सर्वोच्च ४२.२ तापमान नोंदले आहे. सकाळी ११ नंतर तुरळक गर्दी जाणवली. टोपी, स्कार्पचा वापर करून उन्हापासून संरक्षण करण्यावर भर दिल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच उन्हाची तीव्रता नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली.
मार्चएंडपासून सातत्याने तापमानाचा पारा चाळिशी ओलांडून ४१ अंशांपर्यंत पोहोचला. एप्रिलच्या प्रारंभापासून सुरू असलेल्या या उष्म्याने शहर-जिल्ह्यात नागरिकांसह मुक्या पशुपक्ष्यांना हैराण केले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा उष्म्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.
यावर्षीचे सर्वोच्च तापमान आज १९ एप्रिल रोजी ४२.२ अंशांवर पोहोचले़ यापूर्वी मार्च महिन्यात तापमानाने २९ मार्च २०१८ रोजी ४१.६, ३० रोजी ४०.३ तर १ एप्रिलला ४१ अं. से. अशी सलग उन्हाची तीव्रता जाणवू लागली. त्यानंतर मधले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे ही दाहकता थोडीफार कमी झाली; मात्र आज गुरुवारी (१९ एप्रिल) पुन्हा त्यात वाढ होऊन या वर्षातील सर्वोच्च ४२.२ अंश तापमान नोंदले गेले.
१७ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होणार ?- १७ वर्षांपूर्वी ३० एप्रिल २००२ साली एप्रिल महिन्यात सर्वोच्च ४४.१ अं. से. तापमान नोंदले गेले. त्यानंतर २२ एप्रिल २००४ साली ४४ अं. से. आणि ३० एप्रिल २००८ ला ४३.८ अं. से. तापमानाचा पारा चढलेला होता. सोलापूरचे सर्वोच्च तापमान यापूर्वी २० मे २००५ रोजी ४५.१ अंशांवर पोहोचले होते.