- दीपक दुपारगुडे सोलापूर - सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी वारंवार मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. अंगावर पेट्रोल टाकल्याने आपली त्वचा ७ ते आठ टक्के भाजली. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याची तक्रार तय्यब्बा सलमान सय्यद (वय- २२, रा.८८ तिऱ्हेगाव, फाॅरेस्ट सोलापूर) या विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध जुन्या भा. दं. वि. ३२६, ४९८ (अ) अन्वये गुन्हा नोंदला आहे.
सदरचा प्रकार ११ जून २०२३ ते १७ मे २०२४ अन्वये फिर्यादीच्या सासरी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सलमान सय्यद (पती), शकिला सय्यद (सासू), रिजवाना सय्यद, अबोदिन सय्यद (दीर), सर्फनाज सय्यद (दीर), रुक्सार सय्यद (सर्व रा. भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी सासरी तिऱ्हे फाॅरेस्ट येथे नांदत असताना दमदाटी करुन मानसिक व शारीरिक छळ केला जायचा. १७ मे २०२४ रोजी अंगावर पेट्रोल टाकले. यामुळे फिर्यादीची त्वचा ७ ते ८ टक्के जळाली. त्यातून इन्फेक्शन झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास फौजदार गाडवे करीत आहेत.