शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

सोलापुरात चौथ्यांदा होतेय लक्षवेधी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 10:15 AM

बारा लढती झाल्या दुरंगी : सुशीलकुमार शिंदे, आंबेडकर, जयसिध्देश्वरांच्या प्रचाराला गती

ठळक मुद्देसोलापूर मतदारसंघात आजवर झालेल्या तिरंगी लढतींमध्ये तुल्यबळ उमेदवार आमने-सामने होतेसन २००३ (पोटनिवडणूक), २००४ ,२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दुरंगी सामना झालालोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत जनता दलाच्या वतीने रविकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली.

रवींद्र देशमुख

सोलापूर : स्वातंत्र्यानंतर सोलापूर मतदारसंघात झालेल्या अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता येथे चौथ्यांदा तिरंगी लढत होत आहे. १९८०, १९९६, १९९९ नंतर यंदाच्या २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर यांच्यातील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. आजवरच्या पंधरा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात १२ दुरंगी लढती; तर दोन चौरंगी लढती झाल्या.

लोकसभेची आठवी अर्थात १९८० साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे (इंदिरा) गंगाधरपंत कुचन, जनता पार्टीचे पन्नालाल सुराणा आणि अर्स काँग्रेसच्या प्रभाताई झाडबुके यांच्यात तिरंगी लढत झाली. सुराणा आणि झाडबुके हे दोन बार्शीकर एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होती. इंदिरा गांधी यांच्या हयातीत ही निवडणूक झाली. त्यांचा करिष्मा संपूर्ण देशावर होता. त्यामुळे कुचन यांनी ५४ टक्के मत घेऊन ही निवडणूक आरामात जिंकली. सुराणा यांना ९९ हजार ४२१; तर प्रभातार्इंना ६५ हजार ७७ मतांवर समाधान मानावे लागले.

लोकसभेच्या १९९६ च्या निवडणुकीत जनता दलाच्या वतीने रविकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही तिरंगी लढत अधिक रंगतदार झाली. काँग्रेसतर्फे धर्मण्णा सादूल आणि भाजपतर्फे लिंगराज वल्याळ हे निवडणूक रिंगणात उतरले होते. या तिरंगी लढतीचा लाभ भाजपला झाला. वल्याळ हे १,८४,०७५ मते घेऊन विजयी झाले. विशेष म्हणजे पाटील यांनी १,६६,९८८ मते घेऊन दुसरे स्थान पटकाविले; तर सादूल हे तिसºया स्थानावर फेकले गेले. त्यांना १,६२,९७८ मते मिळाली.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून १० जून १९९९ रोजी राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावर्षी झालेल्या लोकसभेच्या तेराव्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. सोलापुरात राष्टÑवादी काँग्रेसकडून डॉ. मुकेश तथा अरळप्पा गंगप्पा अबदुलपूरकर यांनी निवडणूक लढविली. या तिरंगी लढतीत काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या वतीने लिंगराज वल्याळ सहभागी होते. शिंदे यांनी ४७.४९ टक्के अर्थात २,८६,५७८ मते घेऊन विजय संपादन केला होता; तर वल्याळ यांना २,०९,५८३ मते मिळाली. डॉ. अबदुलपूरकर यांना केवळ १,०२,८०३ मते मिळू शकली.

सन २००३ (पोटनिवडणूक), २००४ ,२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत दुरंगी सामना झाला. सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे २००३ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी थेट लढतीत काँग्रेसचे आनंदराव देवकते यांचा पराभव केला होता. २००४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव करून विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकला होता. २००९ मध्ये भाजपने चित्रपट अभिनेते अ‍ॅड. शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांनी जिंकली; तर २०१४ मध्ये अ‍ॅड. बनसोडे यांनी शिंदे यांचा पराभव केला होता.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी- सोलापूर मतदारसंघात आजवर झालेल्या तिरंगी लढतींमध्ये तुल्यबळ उमेदवार आमने-सामने होते. यंदाच्या निवडणुकीतही अशीच लढत होत आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी सुरूवातीचा वैयक्तिक भेटीगाठींचा टप्पा पूर्ण करून प्रत्यक्षात प्रचाराला प्रारंभ केला. आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तिसºयाच दिवशी जिल्ह्यात सभांचा धडाका लावला आहे; तर भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर यांनी वैयक्तिक भेटीगाठी पूर्ण करून रविवारपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथून प्रचार सभांना प्रारंभ केला.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर