राकेश कदमकुंभार वेसेतील लेंडकी नाल्याजवळ गुरुवारी सायंकाळी कोसळणाऱ्या पावसात तीन युवक वाहून जाता-जाता बचावले. तिघांनी एका टेम्पाेचा आधार घेतला. हा आधार नसता तर पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून गेले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शहरात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाउस झाला. कुंभारी वेसेतील रस्त्यावरुन धाे-धाे पाणी वाहू लागले. लेंडकी नाल्याजवळ गुडघाभर पाणी हाेते. एका दुचाकीवरुन जाणारे तीन युवक या पाण्यात अडकले. पाण्याचा वेग प्रचंड हाेता. तिघांनी एका टेम्पाेजवळ गाडी थांबविली. पाण्याचा वेग पाहून तिघेही भेदरले. यापैकी दाेघांनी टेम्पाेला पकडले. एकजण टेम्पाेवर चढला. दुसरा टेम्पाेच्या लटकून उभा हाेता. तिसऱ्या युवकाचा एक हात टेम्पाेच्या आरशाला तर दुसरा हात दुचाकीवरच हाेता. टेम्पाेवर चढलेल्या पहिल्या युवकाने दुसऱ्याला ओढून वर घेतले. यादरम्यान दुचाकीवर थांबलेल्या युवक घाबरला.
काही वेळानंतर तिसरा युवकही टेम्पाेवर चढला. पाण्याचा वेग अधिक असल्याने आजूबाजूला थांबलेले या युवकांना मदत करण्यास धजावत नसल्याचे पाहायला मिळाले. टेम्पाेचा आधार नसता तर तिघेही नाल्यात वाहून गेले असे असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.