- रवींद्र देशमुख सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. शहरातील रुपभवानी मंदिर नाल्याजवळ आणि तुळजापूर नाका हनुमान मंदिराजवळ दोन तरुणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलम ८ (क) अन्वये गुन्हे नोंदले आहेत. अविनाश शिवाजी चव्हाण (वय- २०, मंत्री चंडक, हैद्राबाद रोड, सोलापूर) व अर्जुन महादेव भांडेकर (वय- २४, वडार गल्ली मड्डी वस्ती, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या आदेशानुसार जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी अवैध प्रकार घडणाऱ्या घटनांवर नजर ठेऊन पेट्रोलिंग द्वारे मोहीम आखण्याच्या सूचना केल्या होत्या. या दरम्यान फौजदार बामणे, पोलीस हरिकांत सरवदे यांना रुपाभवानी मंदिर नाल्याजवळ आडोशाला एक तरुण गांजा सेवन करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीत अंमली पदार्थ सेवन केल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला. याशिवाय आणखी एका तरुणाला सपोनि जाधव, पोलीस स्वप्नील कसगावडे यांच्या पथकाने अर्जुन भांडेकर याला तुळज़ापूर नाक्याजवळ पकडून त्याचीही तपासणी केली आणि वरील प्रमाणे गुन्हा नोंदवला.
अंमली पदार्थांचे सेवन नकोअंमली पदार्थांचे सेवन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी बजावले आहेत. सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन जोडभावी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.