सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणाºया बी. कॉम. भाग दोनचा पेपर परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासातच फुटला. हा.. हा म्हणता सोशल मीडियावर व्हायरल झाला. विद्यापीठ प्रशासनाने यावर तातडीने हा पेपर रद्द केल्याचे पत्र ई-मेलद्वारे सर्व प्राचार्यांना पाठविले अन् परीक्षा केंद्रावरील तब्बल दोन हजारांवर विद्यार्थ्यांचे चालू पेपर काढून घेण्यात आले. आता या पेपरची परीक्षा नव्याने २६ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने विविध शाखांच्या पहिल्या सत्रातील परीक्षा सुरू आहेत. गुरुवारी बी. कॉम. भाग २ चा कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर होता. दुपारी २.३० वाजता हा पेपर सुरू झाला. ३० ते ४० मिनिटांतच हा पेपर फुटला अन् वाºयासारखा तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. विद्यापीठात ही वार्ता समजली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, परीक्षा नियंत्रकांनी यावर चर्चा करून तातडीने जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ई-मेल पाठवून कॉर्पोरेट अकाउंटिंगचा पेपर रद्द करण्यात आल्याच्या सूचना दिल्या.
सोलापूर जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर बी. कॉम. भाग २ च्या ‘कॉर्पोरेट अकाउंटिंग’ विषयाचा पेपर सुरू होता. या शाखेच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. २३ डिसेंबरला शेवटचा पेपर आहे. विद्यापीठ प्रशासनाने पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर अन्य परीक्षार्र्थींवर अन्याय होऊ नये, यासाठी २४ व २५ च्या सुट्टीनंतर लागेच २६ डिसेंबरला परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
.. तर त्याच दिवशी पेपर घेता आला असतापेपरफु टीसंदर्भात नेमका प्रकार शोधण्यासाठी विद्यापीठाने आपली यंत्रणा कार्यान्वित केली आहे. संबंधित पेपर हा दुपारी २.३० ला होता. पेपर फुटल्याची कल्पना विद्यापीठाला साधारण ३ वाजून १० मिनिटांनी आली. यानंतर पर्यायी पेपर देऊन परीक्षा घेण्यासाठी पुरेसा अवधीही नव्हता. सकाळी ११ वाजता हा पेपर असता तरी तशी यंत्रणा राबविता आली असती. यासाठी २६ डिसेंबरला पेपर घेण्यात येणार असल्याचे सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा संचालक श्रीकांत कोपरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
किमान दोन हजार परीक्षार्र्थींना मनस्तापच्जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा सुरू आहेत. प्रत्येक केंद्रावर ७० ते २०० अशी सरासरी परीक्षार्र्थींची संख्या होती. पेपर सुरू होताच तासाने तो रद्द झाल्याची कल्पना देण्यात आल्याने २ हजार विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.